मुंबई : अनधिकृत फटाके विक्री करणाऱ्यांवर पालिकेने कारवाईचा बडगा उचलला आहे. २५ ते २९ ऑक्टोबरपर्यंत पालिकेने २२९ किलो फटाके जप्त केले आहेत. वरळी, प्रभादेवी, लोअर परळ विभागात जप्तीची मोठी कारवाई झाली आहे.
दिवाळीनिमित्त प्रत्येक वॉर्डात ठिकठिकाणी फटाक्यांचे मोठे स्टॉल्स उभे राहू लागले आहेत. सुरक्षिततेच्या कारणास्तव पालिकेने त्यावर नजर ठेवण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. प्रत्येक विभागात अधिकृत परवानाधारकांजवळ फटाक्यांचा अतिरिक्त साठा आढळल्यास त्यांच्यावर बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम कलम ३९४ अन्वये कारवाई करण्याच्या सूचना अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या वरिष्ठ निरीक्षकांना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मागील पाच दिवसांत प्रशासनाने फटाक्यांवरील जप्तीच्या कारवाईला वेग दिला आहे.
अनधिकृतवर बंदी : फटाक्यांमुळे कानठळ्या बसवणारे ध्वनी प्रदूषण होतेच शिवाय अनेक घातक रसायने बाहेर पडतात. कचराही मोठ्या प्रमाणात निर्माण होत असल्याने त्याची विल्हेवाट लावणे कठीण जाते. मागच्या वर्षी दिवाळीच्या सात दिवसांत आगीच्या ७९ घटना घडल्या होत्या. त्यामुळे फटाक्यांची तपासणी आवश्यक असते. अनधिकृत फटाके विक्रेत्यांकडील फटाक्यांमध्ये घातक रसायने जास्त असण्याची शक्यता असते. त्यामुळे त्यावर बंदी आणणे आवश्यक असते. अनधिकृत किंवा अतिरिक्त साठा जप्त केल्यानंतर पालिकेकडून नष्ट केला जात असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
विभागनिहाय कारवाई विभाग जप्त केलेले फटाकेए - कुलाबा, कफ परेड ० बी - भेंडी बाजार, मोहम्मद अली रोड, मस्जिद बंदर ९ सी - काळबादेवी, चीरा बाजार, चंदनवाडी ० डी - मलबार हिल, गिरगाव ४ ई - भालखल, माझगाव, चिंचपोकळी ११ एफ दक्षिण - नायगाव, परळ, काळाचौकी १०.५एफ उत्तर - सायन कोळीवाडा, प्रतीक्षा नगर, अँटॉप हिल ६ जी दक्षिण - वरळी बीडीडी, लोअर परळ, बेलासिस रोड २२ जी उत्तर - माटुंगा पश्चिम, माहीम ० एच पूर्व - टीचर्स कॉलनी, कहर पूर्व, सांताक्रूझ पूर्व ६.५ एच पश्चिम - खार पश्चिम, वांद्रे पश्चिम ० के पूर्व - मरोळ मोरोशी, विलप्राले पूर्व, जोगेश्वरी पूर्व १६ के पश्चिम - चार बंगलो, लोखंडवाला, जुहू ४३ पी दक्षिण - चिंचोली बंदर, आरे कॉलनी, गोरेगाव ९. पी उत्तर - मालवणी, मध, पिष्प पार्क ० आर दक्षिण - चारकोप, डहाणूकर वाडी, बंदर पाखाडी १८ आर मध्य - वजीर नाका, कुलूपवाडी, गोराई, बोरिवली ५एल - काजू पद, चांदिवली, पवई १८ एम पूर्व - वाशी नाका, चेंबूर, मानखुर्द, गोवंडी ० एम पश्चिम - पोस्टल कॉलनी, सुमन नगर ९ एन - रमाबाई नगर, घाटकोपर, विद्याविहार ० एस - कन्नमवार नगर, पवई आयआयटी, भांडुप ३.५टी - मुलुंड कॉलनी, मुलुंड १६