बेकायदा गेस्ट हाउस चालकांचा दबाव

By admin | Published: June 23, 2017 01:16 AM2017-06-23T01:16:09+5:302017-06-23T01:16:09+5:30

मनोरी परिसरात सुरू असलेल्या ४९ अनधिकृत गेस्ट हाऊस चालकांकडून या गेस्ट हाऊसविरूद्ध कारवाई होऊ नये यासाठी महापालिका विभाग कार्यालयावर दबाव आणला जात आहे

Unauthorized guest house drivers pressure | बेकायदा गेस्ट हाउस चालकांचा दबाव

बेकायदा गेस्ट हाउस चालकांचा दबाव

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मनोरी परिसरात सुरू असलेल्या ४९ अनधिकृत गेस्ट हाऊस चालकांकडून या गेस्ट हाऊसविरूद्ध कारवाई होऊ नये यासाठी महापालिका विभाग कार्यालयावर दबाव आणला जात आहे. दोन दिवसांपूर्वी या गेस्ट हाऊस चालकांनी पी उत्तर विभाग कार्यालयात काही वेळ ठिय्या मांडला होता.
या गेस्ट हाऊस चालकांकडून अग्निसुरक्षेचे नियम पायदळी तुडवत व्यवसाय चालवण्यात येत असून याबाबत कडक कारवाई करण्याची सूचना अग्निशमन दलाने महापालिका विभाग कार्यालयाला केली आहे. तर दुसरीकडे महापालिकेने हा विभाग एमएमआरडीएच्या हद्दीत मोडत असल्याने याबाबत एमएमआरडीएला पत्र पाठवून कारवाईची सूचना केली आहे.
राष्ट्रीय भ्रष्टाचार आणि अपराध निवारक परिषदेचे अध्यक्ष मोहन कृष्णन यांनी या अनधिकृत गेस्टहाऊसबाबत महापालिका आयुक्तांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत संबंधितांकडे लेखी तक्रार केली होती. त्या तक्रारीची दखल घेत अग्निशमन दलाने मनोरी परिसराला भेट देऊन येथील अनधिकृत गेस्ट हाऊसची पाहणी केली असता धक्कादायक बाबी उघडकीस आल्या. येथे अग्निसुरक्षेबंबंधात केवळ सात गेस्ट हाऊस, रिसॉर्टकडून योग्य ती कागदपत्रे आणि ना हरकत प्रमाणपत्रे सादर करण्यात आली तर उर्वरीत ४९ गेस्ट हाऊसमध्ये अग्निसुरक्षेसंबंधात नियम पाळण्यात आले नसल्याचे अग्निशमन दलाच्या अहवालात म्हटले आहे.
गेस्ट हाऊस चालकांनी पालिका पी /उत्तर विभाग कार्यालयात जात तेथील अधिकाऱ्याला तक्रारदार मोहन कृष्णन यांना कार्यालयात बोलावण्यास सांगितले. मात्र पालिका अधिकाऱ्याने तसे करणे नियमबाह्य असल्याचे सांगत त्यांना नकार दिला. अनधिकृत रिसॉर्ट चालवण्यात एका आमदाराच्या हस्तकाचा समावेश असल्याने या गेस्ट हाऊसना राजकीय वरदहस्त असल्याचाही आरोप केला जात आहे. या बांधकामांसाठी सीआरझेडचे उल्लंघन करण्यात आले असून तिवरांची कत्तलही करण्यात आल्याची तक्रार मोहन कृष्णन यांनी केली आहे.
एकूण ४९ गेस्ट हाऊसची अग्निशमन दलाने पाहणी करून पी/उत्तर विभाग कार्यालयातील बिल्डिंग आणि फॅक्टरी विभागाच्या सहाय्यक अभियंत्यांनी अग्निसुरक्षेसंदर्भात प्रक्रिया पूर्ण न करता तसेच ना हरकत प्रमाणपत्र न देता येथे होणाऱ्या व्यवसायाची दखल घेत महापालिका अधिनियमानुसार कारवाई करावी, अशी सूचना मालाड अग्निशमन केंद्राच्या अधिकाऱ्यांनी केली आहे. पी/उत्तर विभागाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनीही सहाय्यक अभियंत्यांना अशाच प्रकारची सूचना केली आहे.

Web Title: Unauthorized guest house drivers pressure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.