Join us

अनधिकृत होर्डिंगबाजी सुरूच

By admin | Published: January 02, 2015 12:42 AM

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही नवी मुंबईमध्ये अनधिकृत होर्डिंगबाजी सुरूच आहे. अनेक राजकीय पदाधिकाऱ्यांनी पालिकेची परवानगी न घेता होर्डिंग लावले

नामदेव मोरे - नवी मुंबईउच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही नवी मुंबईमध्ये अनधिकृत होर्डिंगबाजी सुरूच आहे. अनेक राजकीय पदाधिकाऱ्यांनी पालिकेची परवानगी न घेता होर्डिंग लावले असून, याविषयी नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. अनधिकृत होर्डिंग लावणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. महापालिकांनी होर्डिंगबाजी थांबविण्यासाठी हेल्पलाइन सुरू करण्याचे आदेशही दिले आहेत. नवी मुंबई महापालिकेनेही कारवाई व हेल्पलाइन सुरू केली आहे. यामुळे अनधिकृत होर्डिंगवर काही प्रमाणात नियंत्रण आले आहे. नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी प्रत्येक वर्षापेक्षा या वेळी संख्या कमी आहे. अनेकांनी परवानगी घेऊन होर्डिंग लावले आहेत. परंतु अद्याप काही राजकीय पदाधिकाऱ्यांनी फुकटच्या शुभेच्छा देण्याची मोहीम सुरूच ठेवली आहे.पोलिसांचा कडक बंदोबस्ततरुणाईचे प्रमाण जास्त असलेल्या पब व बारबाहेर पोलिसांनीही कडक बंदोबस्त ठेवला होता. सीबीडीमध्ये एका पबबाहेर तीन वाजले तरी तरुण-तरुणी जात नव्हते. त्यांना समजावून घरी जाण्याचे आवाहन पोलीस करत असल्याचे पाहावयास मिळाले. तरुणाईचा धिंगाणा पाहण्यासाठी बघ्यांची गर्दीही मोठ्या प्रमाणात जमली होती. या सर्वांना हटवितानाही पोलिसांना कसरत करावी लागत होती. १नेरूळमध्ये रेल्वे स्टेशन, सेक्टर १६ जाणाऱ्या रोडजवळ, सेक्टर २० समोरील तलावाजवळ शिवसेना, काँगे्रस, नाईक समर्थक व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी परवानगी न घेताच होर्डिंग लावले आहेत. २सीवूड रेल्वे स्टेशनच्या प्रवेशद्वारावर राष्ट्रवादी काँगे्रस व भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी विनापरवाना होर्डिंग लावले आहेत. उड्डाणपूल, डी मार्ट चौकातही होर्डिंग लावण्यात आले आहेत. ३सानपाडामध्ये पोलीस स्टेशनबाहेर व इतर ठिकाणीही विनापरवाना जाहिरातबाजी करण्यात आली असून, संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.च्या वर्षी ३१ डिसेंबरला पामबीच रोडवरील मुख्यालयामध्ये आकर्षक विद्युत रोशणाई केली होती. रात्री १२ वाजता मुख्यालयावर फटाक्यांची आतशबाजी करण्यात आली. मुख्यालयामधील हा सोहळा पाहण्यासाठी शेकडो नागरिकांनी गर्दी केली होती. आतापर्यंत नववर्षाच्या स्वागतासाठी नागरिक गेटवे आॅफ इंडिया व मरिन ड्राइव्हवर गर्दी करतात. नवी मुंबईकरांना एकत्र येण्यास हक्काचे लँडमार्कच नव्हते. च्या वर्षी महापालिकेच्या मुख्यालयाच्या स्वरूपाने नववर्षाचे स्वागत करण्यासाठी लँडमार्क प्राप्त झाले आहे. महापालिका मुख्यालयामधील आतशबाजीविषयी रात्रीपासूनच उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. सोशल मीडियातून याविषयी टीका केली जात होती. परंतु विशेष म्हणजे या आतशबाजीसाठी महापालिकेच्या पैशांचा वापर करण्यात आलेला नाही. नवी मुंबईकरांना नवीन वर्षाचे उत्साहात स्वागत करता यावे यासाठी महापौर सागर नाईक यांनी पुढाकार घेऊन ही आतशबाजी केल्याची माहिती सूत्रांनी दिली.च्नवीन वर्षाच्या स्वागतासाठी ३१ डिसेंबरला रात्री शहरातील पब व इतर ठिकाणी विशेष पार्ट्यांचे आयोजन केले होते. मद्यप्राशन करून झिंगलेली तरुणाई पहाटेपर्यंत शहरात भटकंती करत होती. यात युवतींची संख्याही लक्षणीय होती. अतिमद्यप्राशनामुळे अनेक मुलींना चालताही येत नसल्याचे चित्र पाहावयास मिळत होते.च्आतापर्यंत नववर्षानिमित्त बारमध्ये फक्त तरुण व पुरुषांचेच प्रमाण जास्त असायचे. परंतु पब व डीजे पार्ट्यांचे प्रमाण वाढल्यामुळे युवतींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. बुधवारी रात्री सीबीडी परिसरातील पब व इतर हॉटेलमध्ये तरुणांना आकर्षित करण्यासाठी डीजे व इतर संगीत कार्यक्रमांचे आयोजन केले होते. रात्री अडीच वाजेपर्यंत या पार्ट्या सुरू होत्या.च्तीन वाजण्याच्या सुमारास पोलिसांच्या उपस्थितीमध्ये पार्ट्या थांबवल्या. या वेळी सीबीडीमध्ये ४०० ते ५०० युवक व युवती मद्यधुंद अवस्थेमध्ये हॉटेलमधून बाहेर पडत होते. आग्रोळी येथील उड्डाणपुलाच्या चौकात असलेल्या पबबाहेरील अनेक तरुणींना अतिमद्यप्राशनाने चालता येत नव्हते. धडपडत या मुली मित्रांसोबत वाहनाकडे जात असल्याचे चित्र होते. अनेक जण पायी जात होते तर काहींनी रोडच्या कडेला बसकन मांडली होती.३२७ तळीरामांवर कारवाई वाहतूक पोलिसांनी मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांविरोधात बुधवारी सायंकाळपासूनच कारवाई सुरू केली होती. शहरातील सर्व प्रमुख रोडवर वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी बॅरीकेट लावण्यात आली होती. पहाटेपर्यंत ३२७ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.