अनधिकृत पार्किंग करणाऱ्यांकडून महिन्याभरात ६७ लाख दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2019 01:26 AM2019-08-09T01:26:53+5:302019-08-09T01:27:03+5:30
दररोज सरासरी सव्वादोन लाख रुपये दंड पालिकेच्या तिजोरीत या कारवाईच्या माध्यमातून जमा होत आहे.
मुंबई : अनधिकृत पार्किंगला शिस्त लावण्यासाठी सुरू असलेल्या कारवाई अंतर्गत महिन्याभरात एक हजार ४६ वाहनधारकांकडून ६७ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. दररोज सरासरी सव्वादोन लाख रुपये दंड पालिकेच्या तिजोरीत या कारवाईच्या माध्यमातून जमा होत आहे.
मुंबईतील पार्किंगला शिस्त लावण्यासाठी सार्वजिनक वाहनतळाच्या पाचशे मीटर परिसरात पार्किंगला मनाई करण्यात आली आहे. यासाठी २९ वाहनतळ महापालिकेने मुंबईकरांना उपलब्ध करून दिले आहेत. त्यानुसार मुख्य रस्त्याला जोडणाºया रस्त्यांवर तसेच वाहनतळाच्या बाहेर पार्किंग करणाऱ्यांना पाच हजार ते दहा हजार रुपये दंड करण्यास ७ जुलैपासून पालिकेने सुरुवात केली.
या कारवाईच्या पाहिल्याच आठवड्यात पालिकेने २३ लाख रुपये दंड वसूल केला. तर दुसºया आठवड्यात ९ जुलै रोजी सहा लाख रुपये दंड वसूल करण्यात आला. गेल्या महिन्याभरात ६८४ चार चाकी आणि २४ तीन चाकी तर ३३३ दुचाकी वाहन मालकांकडून ही रक्कम वसूल करण्यात आली. वाहनतळांची संख्या अधिक असलेल्या चेंबूर आणि मानखुर्द विभागातून ३० हजार रुपये म्हणजे सर्वांत कमी दंड वसूल झाला़
स्थानिकांना पार्किंगसाठी सूट
अंधेरी-जोगेश्वरीतून २४ लाख, वांद्रे आणि कालिना येथून १४ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला.
कारवाईच्या दणक्यामुळे अनधिकृत पार्किंगवर काही प्रमाणात नियंत्रण येऊ लागले आहे. त्यामुळे दररोज वसूल होणाºया दंडाच्या रकमेतही आता घट दिसून येत आहे.
२९ सार्वजनिक वाहनतळांत एकूण ४० हजार वाहने उभी करण्याची सुविधा आहे. स्थानिक रहिवाशांना या वाहनतळांवर गाडी उभी करण्यासाठी ५० टक्के सूट दिली.