टँकरच्या अनधिकृत पार्किंगमुळे वाहन चालकांना अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:06 AM2021-03-31T04:06:54+5:302021-03-31T04:06:54+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : चेंबूरच्या बी.डी. पाटील मार्गावर शंकर देऊळ ते गव्हाणगाव या परिसरांच्या दरम्यान ऑइल आणि केमिकल ...

Unauthorized parking of tankers hinders motorists | टँकरच्या अनधिकृत पार्किंगमुळे वाहन चालकांना अडथळा

टँकरच्या अनधिकृत पार्किंगमुळे वाहन चालकांना अडथळा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : चेंबूरच्या बी.डी. पाटील मार्गावर शंकर देऊळ ते गव्हाणगाव या परिसरांच्या दरम्यान ऑइल आणि केमिकल टँकरची अनधिकृत पार्किंग वाहन चालकांसाठी मोठा अडथळा ठरत आहे. या मार्गावर दिवसभर टँकर्सची अनधिकृतरीत्या पार्किंग करण्यात येते. अर्धा रस्ता येथे उभे असणाऱ्या टँकरनेच व्यापलेला असतो. या परिसरात आजूबाजूला ऑइल, रासायनिक व पेट्रोलियम कंपन्यांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे चेंबूरमधील आरसी मार्ग आणि बी.डी. पाटील मार्गावर कायम अवजड वाहनांची ये-जा सुरू असते. त्यातच या दोन्ही मार्गांच्या दुरुस्तीचे काम महानगरपालिकेतर्फे हाती घेण्यात आल्याने या मार्गावर दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होते. या अनधिकृत पार्किंगमुळे येथील वाहतूककोंडीत अजून भर पडते.

या परिसरामध्ये माहुल गाव, आरसीएफ कॉलनी, गव्हाणगाव, आणिक गाव, वाशी गाव, वाशी नाका, प्रयाग नगर असे मोठे नागरी वस्ती असणारे परिसर असल्याने येथील रहिवासी दुचाकी व रिक्षाद्वारे या मार्गावरून प्रवास करत असतात. या रहिवाशांना या अनधिकृत पार्किंगचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वाहतूक विभागाने येथे उभ्या असणाऱ्या टँकरवर कारवाई करण्याची मागणी स्थानिक रहिवासी व वाहन चालक करत आहेत.

Web Title: Unauthorized parking of tankers hinders motorists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.