अनधिकृत रॅम्पवर पालिका मेहरबान
By admin | Published: December 13, 2014 01:21 AM2014-12-13T01:21:52+5:302014-12-13T01:21:52+5:30
बॉलीवूड अभिनेता शाहरूख खानने त्याच्या वांद्रे पश्चिमेतील बॅण्ड स्टॅण्ड येथील मन्नत बंगल्याबाहेरील 3क्क् वर्षापूर्वीचा रस्ता अरुंद करत 2क्क्6 साली आलिशान कार ठेवण्यासाठी अनधिकृत रॅम्प बांधला होता.
Next
मनोहर कुंभेजकर ल्ल वांद्रे
बॉलीवूड अभिनेता शाहरूख खानने त्याच्या वांद्रे पश्चिमेतील बॅण्ड स्टॅण्ड येथील मन्नत बंगल्याबाहेरील 3क्क् वर्षापूर्वीचा रस्ता अरुंद करत 2क्क्6 साली आलिशान कार ठेवण्यासाठी अनधिकृत रॅम्प बांधला होता. त्यामुळे हा पूर्वी 9.3 मीटर असलेला रस्ता 6 मीटर अरुंद झाला आहे. पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांच्याकडे वारंवार तक्रार करूनसुद्धा पालिका प्रशासनाने या अनधिकृत रॅम्पवर कारवाई केली नसल्याने आज वांद्रे (प.) येथील एच प्रभाग समितीची बैठक तहकूब करण्यात आली.
काँंग्रेसचे नगरसेवक ब्रायन मिरांडा यांनी या प्रकरणी आज सकाळी प्रभाग समितीच्या बैठकीत हरकतीचा मुद्दा उपस्थित केला होता. चार महिन्यांपूर्वीदेखील प्रभाग समितीच्या बैठकीत त्यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित केला होता. मात्र पालिका प्रशासनाने यावर कारवाई न केल्यामुळे मिरांडा यांनी पुन्हा मुद्दा उपस्थित केला. पालिका प्रशासनाच्या या
गलथान कारभाराबद्दल निषेध करत या प्रभागातील सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रभाग समितीची बैठक तहकूब
केली.
या संदर्भात वॉचडॉग फाउंडेशनचे निकोलस अल्मेडा आणि ग्रॉडफे पिमेटा यांनी या प्रकरणी कारवाई करावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. आमदार आशिष शेलार यांनीदेखील या प्रकणी पालिका आयुक्तांनी कारवाई करावी, अशी मागणी करूनसुद्धा शाहरूखच्या अनधिकृत बांधकामावर अजूनही कारवाई झाली नसल्याचे निकोलस अल्मेडा यांनी सांगितले. एच विभागाचे साहाय्यक पालिका आयुक्त विजय कांबळे यांच्या जनता दरबारात निकोलस अल्मेडा यांनी या बांधकामावर कारवाई करावी, अशी मागणीही केली आहे.
याविरोधात त्यांनी वांद्रे कोर्टात तक्रार केली असून या महिन्यात त्यावर सुनावणी होणार आहे. शाहरूख खान, पालिका आयुक्त सीताराम कुंटे आणि तीन पालिका अधिका:यांना यात प्रतिवादी करण्यात आले आहे. पालिका प्रशासन शाहरूख खानवर मेहेरबान झाले असून त्याच्या बंगल्याला पालिकेने ओसी दिली आहे का, असा सवालही एच प्रभाग समितीच्या बैठकीत उपस्थित झाला होता.
च्या संदर्भात वॉचडॉग फाउंडेशनचे निकोलस अल्मेडा आणि ग्रॉडफे पिमेटा यांनी या प्रकरणी कारवाई करावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. आमदार आशिष शेलार यांनीदेखील या प्रकणी पालिका आयुक्तांनी कारवाई करावी, अशी मागणी करूनसुद्धा शाहरूखच्या अनधिकृत बांधकामावर अजूनही कारवाई झाली नसल्याचे निकोलस अल्मेडा यांनी सांगितले.