Join us  

रेल्वे ई-तिकिटांचा ‘अनधिकृत’ ट्रॅक

By admin | Published: April 18, 2016 1:02 AM

मेल-एक्सप्रेस गाड्यांची ई-तिकिटे काढताना प्रवाशांना मोठ्या प्रमाणात वेटिंग लिस्टचा सामना करावा लागतो. अवघ्या काही सेकंदांत वेटिंग येत असल्याने यात दलालांकडून गैरप्रकार केले

मुंबई : मेल-एक्सप्रेस गाड्यांची ई-तिकिटे काढताना प्रवाशांना मोठ्या प्रमाणात वेटिंग लिस्टचा सामना करावा लागतो. अवघ्या काही सेकंदांत वेटिंग येत असल्याने यात दलालांकडून गैरप्रकार केले जात नाहीत ना, अशी शंका वाटू लागते. याविरोधात सध्या पश्चिम रेल्वे आरपीएफकडून (रेल्वे सुरक्षा दल) मोहीम घेण्यात आली असून, २0१५-१६ मध्ये तब्बल २८0 दलालांना अटक करण्यात आली आहे. २0१४-१५ शी तुलना करता २0१५-१६ मध्ये तब्बल पाचपट अधिक प्रकरणे उघडकीस आली आहेत. दलालांकडून अनधिकृपणे ई-तिकिटे काढण्यासाठी वेगळ्या प्रकारच्या सॉफ्टवेअरचाही अवलंब केला जात असून, त्याला बाजारात मोठी मागणी असल्याचे रेल्वे पोलीस सांगतात. लांब पल्ल्याच्या गाड्यांचे ई-तिकीट आयआरसीटीसीमार्फ आरक्षित करताना प्रवाशांना बरीच कसरत करावी लागते. प्रवाशांना तत्काळ तिकीट उपलब्ध व्हावी, या उद्देशाने आयआरसीटीसीमार्फत अनेक उपाययोजनाही करण्यात आल्या आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे दलालांच्या विळख्यातून सुटका मिळावी यासाठी तिकीट आरक्षित करण्याची क्षमताही वाढविण्यात आली. तरीही प्रवाशांना तिकीट मिळविताना कराव्या लागणाऱ्या कसरतीतून सुटका झालेली नाही. आयआरसीटीसीकडून गेल्या काही वर्षांत आरपीएफची मदत घेतली जात आहे. ई-तिकिटांतील गैरप्रकार रोखतानाच प्रवाशांची फसवणूक थांबविण्यासाठी आरपीएफकडून मोठ्या प्रमाणात कारवाईही केली जात आहे. (प्रतिनिधी)पश्चिम रेल्वे मार्गावर ई-तिकिटांतील गैरप्रकार रोखण्यासाठी विशेष मोहीमही हाती घेण्यात येत आहेत. या मोहिमेतून दलालांचे सक्रिय असलेले रॅकेटच उद्ध्वस्त केले जात आहे. पश्चिम रेल्वे सुरक्षा दलाने ई-तिकिटांची २0१५-१६ मध्ये २२८ प्रकरणे उघडकीस आणली असून, २८0 दलालांना अटक केली आहे. २0१४-१५ मध्ये ई-तिकिटांतील दलालीच्या फक्त ४७ केसेस नोंदविताना यात ५८ दलालांना अटक केली होती. हे पाहता पाच पट अधिक प्रकरणे पश्चिम रेल्वे आरपीएफकडून उघडकीस आणण्यात आली आहेत. ई-तिकिटे अनधिकृत दलालांकडून काढताना एका विशेष सॉफ्टवेअरचा वापरही केला जात असल्याचे आरपीएफमधील वरिष्ठ अधिकारी सांगतात. २0१५-१६ मध्ये १ कोटींची तिकिटे हस्तगत२0१४-१५ मध्ये दलालांवर केलेल्या कारवाईतून २५ लाख ६६ हजार रुपये किमतीची तिकिटे हस्तगत करण्यात आली. २0१५-१६ मध्ये तिकिटांच्या मूल्यात चौपट वाढ झाली असून, तब्बल १ कोटी १0 लाख रुपयांची तिकिटे हस्तगत करण्यात आली आहेत. नालासोपारा, विरार, मरिन लाइन्स, जोगेश्वरी, गोरेगाव, अंधेरी, बोरीवली, वांद्रे येथे काही ठिकाणी सातत्याने ई-तिकिटांतील गैरप्रकार उघडकीस आले आहेत. तिकिटे काढण्यासाठी सॉफ्टवेअरचा वापरसध्या अनधिकृतपणे तिकीट आरक्षण करणारे सॉफ्टवेअर बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. सॉफ्टवेअर विकसित करणाऱ्या दलालांकडूनही महिन्याला २,५00 रुपयांना भाड्यावर ते दिले जाते.पीआरएसवरील तिकीट खिडक्या सुरू होताच या सॉफ्टवेअरमार्फत शिरकाव करून काही सेकंदांतच तिकीट आरक्षित केली जतात. सॉफ्टवेअरमधून तिकिटांची विक्री करताना तर प्रत्येक तिकिटामागे एक हजार ते १,२00 रुपये अधिक शुल्क आकारले जाते. अधिकृत दलालांचाही यात समावेश असल्याचे निदर्शनास आले आहे. आयआरसीटीने दिलेल्या एका विशेष आयडीवरून त्यांना आखून दिलेल्या आरक्षण क्षमतेनुसार जास्त तिकिटे काढतात आणि त्याची विक्री करतात. तसेच त्यांच्याकडूनही विशिष्ट सॉफ्टवेअर वापरून बनावट ओळखपत्राच्या साहाय्याने तिकीट विक्री केली जाते.प्रवाशांनीही अनधिकृपणे तिकिटे काढण्याऐवजी रीतसर व कायदेशीर मार्गाने तिकिटे काढावीत. दलालांना पकडण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाकडून नेहमीच कारवाई केली जाते. यापुढेही काही मोहीम हाती घेण्यात येणार आहेत. - आनंद झा (पश्चिम रेल्वे सुरक्षा दल - वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त)-