आरक्षित तिकिटांवर अनधिकृत प्रवास
By admin | Published: April 16, 2016 02:43 AM2016-04-16T02:43:59+5:302016-04-16T02:43:59+5:30
आरक्षित तिकीट अनधिकृतपणे दुसऱ्या प्रवाशाच्या नावावर बदली करण्याच्या अनेक घटना मध्य रेल्वेमार्गावर उघडकीस येत आहेत. गेल्या तीन महिन्यांत असे प्रकार करणाऱ्या
मुंबई : आरक्षित तिकीट अनधिकृतपणे दुसऱ्या प्रवाशाच्या नावावर बदली करण्याच्या अनेक घटना मध्य रेल्वेमार्गावर उघडकीस येत आहेत. गेल्या तीन महिन्यांत असे प्रकार करणाऱ्या तब्बल २00४ लोकांना पकडण्यात आले असून, ही कारवाई आणखी कठोर करण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले.
मेल-एक्सप्रेसचे वेटिंग लिस्टचे तिकीट असूनही अनेक जण उभ्याने प्रवास करतात. अशावेळी लांबच्या प्रवासात उभ्याने प्रवास टाळण्यासाठी अन्य प्रवाशाच्या आरक्षित तिकिटावर प्रवास करण्याचा निर्णय काही प्रवासी घेतात. मात्र हा प्रवास अनधिकृत असल्याने त्याविरोधात रेल्वेकडून कारवाईही केली जाते. २0१६ च्या जानेवारी ते मार्च या महिन्यांत आरक्षित तिकीट दुसऱ्या प्रवाशाच्या नावावर बदली करण्याच्या तब्बल २00४ केसेस नोंदविल्या आहेत. त्यांच्यावर केलेल्या दंडात्मक कारवाईतून १४ लाख ३0 हजार रुपयांचे उत्पन्न मध्य रेल्वेला मिळाले आहे. मार्च महिन्यात २६८ केसेस दाखल झाल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले. या महिन्यात केलेल्या दंडात्मक कारवाईतून २ लाख ४३ हजार रुपये दंड मिळाला आहे.
एखाद्या प्रवाशाकडे चार ते पाच तिकिटे असतील आणि त्यातील एखादे तिकीट रद्द झाल्यास ते तिकीट दुसऱ्या प्रवाशाला परस्पर देणे, तसेच दलालांकडे असलेल्या एखाद्या प्रवाशाचे तिकीट रद्द झाल्यास दलालांकडून तेच तिकीट दुसऱ्या प्रवाशाला वळते करणे यामुळे हा प्रवास अनधिकृतच मानला जातो.
अनधिकृत प्रवास
मध्य रेल्वेमार्गावर एप्रिल २0१५ ते मार्च २0१६ पर्यंत २४ लाख ३१ हजार केसेस विनातिकीट प्रवाशांच्या दाखल झाल्या आहेत. त्यांच्यावर केलेल्या दंडात्मक कारवाईतून १२0 कोटी ५७ लाख रुपये मध्य रेल्वेला मिळाले.
मार्च २0१६ मध्ये १ लाख ८७ हजार विनातिकीट प्रवाशांच्या केसेसची नोंद आहे. या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई केल्यानंतर ९ कोटी ११ लाख रुपये दंड मध्य रेल्वेला मिळाला.
२0१६ मधील केसेसची नोंद
महिनाकेसेसदंड
जानेवारी७४७५ लाख ४0 हजार
फेब्रुवारी९८९६ लाख ४७ हजार
मार्च२६८२ लाख ४३ हजार