अनधिकृत बांधकामांकडील दुर्लक्ष अधिकाऱ्यांना भोवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 06:21 AM2019-07-20T06:21:19+5:302019-07-20T06:21:23+5:30

डोंगरी येथे मंगळवारी कोसळलेल्या इमारतीची जबाबदारी महापालिका प्रशासनाने झटकली, तरी या दुर्घटनेने बी विभागातील अनधिकृत बांधकामांकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचे उघड झाले आहे.

Unaware of the unauthorized constructions, the officers will be scared | अनधिकृत बांधकामांकडील दुर्लक्ष अधिकाऱ्यांना भोवणार

अनधिकृत बांधकामांकडील दुर्लक्ष अधिकाऱ्यांना भोवणार

googlenewsNext

मुंबई : डोंगरी येथे मंगळवारी कोसळलेल्या इमारतीची जबाबदारी महापालिका प्रशासनाने झटकली, तरी या दुर्घटनेने बी विभागातील अनधिकृत बांधकामांकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचे उघड झाले आहे. याची गंभीर दखल घेऊन आयुक्तांनी बी विभागातील सहायक आयुक्त विवेक राही यांना निलंबित केले आहे. मात्र, ही कारवाई एवढ्यावरच थांबणार नसून या विभागातील आणखी काही आजी-माजी अधिकारीही गोत्यात येणार आहेत.
डोंगरी येथे इमारत कोसळून १३ रहिवाशांचा मृत्यू झाला. या इमारतीच्या मालकीवरून म्हाडा आणि पालिका प्रशासनामध्ये वाद सुरू आहे. ही इमारत अनधिकृत असल्याचा दावा म्हाडा करीत असताना आयुक्तांनी मात्र उपकरप्राप्त इमारतीचाच हा भाग असल्याचे गुरुवारी सांगितले. मात्र, बी विभागात मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकाम सुरू असल्याने तेथील साहाय्यक आयुक्तांना निलंबित करण्याची मागणी सर्व नगरसेवकांनी लावून धरली.
त्यानुसार, दक्षता खात्याच्या अधिकाºयांनी डोंगरी व आसपासच्या परिसरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली होती का, याची पाहणी केली. मात्र, कोणतीही कारवाई न करता अनधिकृत बांधकामांच्या मालकांना आॅडिटसाठी नोटीस पाठविण्यात येत असल्याचे दिसून आले. त्यानुसार राही यांना निलंबित करून त्यांची विभागीय चौकशी करण्यात येत आहे. त्याचबरोबर त्यांच्या खालोखाल असलेल्या अधिकाºयांची यातील भूमिका तपासून कारवाईबाबत निर्णय
होईल, असे एका अधिकाºयाने सांगितले.
>राजकीय नेतेही जबाबदार
अनधिकृत बांधकामांप्रकरणी त्या विभागातील अधिकाºयांएवढेच स्थानिक राजकीय नेतेही जबाबदार आहेत, असा आरोप स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी केला. या थेट आरोपामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या असून आता याप्रकरणी कोणाकोणावर कारवाई होणार, याकडे लक्ष लागले आहे.
>सहायक आयुक्त विसपुतेंवर जबाबदारी
सी विभाग कार्यालयाचे सहायक आयुक्त विनायक विसपुते यांच्याकडे बी वॉर्डचीही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. विसपुते यांना डोंगरी, मोहम्मद अली रोड येथील अनधिकृत बांधकामांची पाहणी करून त्याचा अहवाल बनविण्यास सांगण्यात आले आहे. त्यानुसार गेल्या काही वर्षांपासून अनधिकृत बांधकामांच्या तक्रारींची यादीही तयार करण्यात येत आहे.
कारवाईची सूचना : अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी प्रत्येक विभागात पथक आहे. तरीही अनधिकृत बांधकाम अधिकाºयांसाठी कमाईचे साधन बनले आहे. त्यामुळे अनधिकृत बांधकामेही पायधुनी, मोहम्मद अली रोड, डोंगरी या परिसरात वाढली आहेत. त्यामुळे अधिकाºयांबरोबरच राजकीय नेत्यांवरही कारवाई करण्याची सूचना जाधव यांनी केली.

Web Title: Unaware of the unauthorized constructions, the officers will be scared

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.