Join us

बेवारस बॅगेने फोडला घाम!

By admin | Published: December 14, 2014 12:59 AM

सकाळच्या घाईच्या वेळेत फुटपाथवर एक बेवारस बॅग आढळल्याने चेंबूर रेल्वे स्थानक परिसरातील पादचारी, दुकानदारांची भीतीने गाळण उडाली.

मुंबई : सकाळच्या घाईच्या वेळेत फुटपाथवर एक बेवारस बॅग आढळल्याने चेंबूर रेल्वे स्थानक परिसरातील पादचारी, दुकानदारांची भीतीने गाळण उडाली. दुसरीकडे बॅग उघडून त्यात काय आहे हे तपासताना सुरक्षा यंत्रणांचीही धावपळ झाली. अखेर बॅगेत काहीच न आढळल्याने सर्वाचाच जीव भांडय़ात पडला. 
सकाळच्या सुमारास चेंबूर रेल्वे स्थानक परिसर नोकरदार चाकरमान्यांनी गच्च भरलेला असतो. रेल्वे स्थानक गाठण्यासाठीची धावपळ येथे दिसून येते. आजही नेहमीप्रमाणो स्थानक परिसरात घाईगर्दी असताना 11च्या सुमारास फुटपाथवर एक बॅग ब:याच वेळापासून बेवारस अवस्थेत पडून असल्याचे दुकानदारांना आढळले. त्यांच्यापैकी काहींनी तत्काळ पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून बेवारस बॅगेची माहिती दिली. त्यानुसार चेंबूर पोलीस ठाण्यातील अधिकारी, बॉम्ब शोधक व नाशक पथक (बीडीडीएस) आणि श्वानपथक घटनास्थळी दाखल झाले.
सुरुवातीला पोलिसांनी बॅरीकेड्स लावून परिसर मोकळा केला. त्यानंतर प्रशिक्षित श्वानाने बॅगेत स्फोटके नाहीत, असे संकेत दिले. त्यानंतर बीडीडीएसमधील तज्ज्ञ अधिका:यांनी अलगद बॅगेची तपासणी केली. त्यातही स्फोटके नाहीत, हे स्पष्ट झाले. तेव्हा बॅग उघडली. त्यात कपडे आढळले. बॅगेत बॉम्ब नाही हे स्पष्ट होताच दुकानदार व सुरक्षा यंत्रणांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. (प्रतिनिधी)
 
1चेंबूर स्थानक परिसरात अवैधरीत्या धंदा करणा:या शेकडो फेरीवाल्यांवर काही दिवसांपूर्वी पालिकेने कारवाई केली होती. मुळात या फेरीवाल्यांमुळे संध्याकाळच्या सुमारास स्थानकाशेजारील एन.जी. आचार्य मार्गावर ग्राहकांची प्रचंड गर्दी होई. 
 
2येथून चालणोही मुश्कील होत असे. त्यामुळे स्थानिक रहिवाशांना पालिकेच्या कारवाईमुळे हायसे वाटले होते. तर पालिकेची कारवाई मनमानी असल्याचा दावा करीत फेरीवाल्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. 
 
3तेव्हा या गर्दीचा फायदा घेत अतिरेकी घातपात घडवू शकतात, असा दावा शासनाच्या वतीने करण्यात आला होता. तो मान्य करीत न्यायालयाने फेरीवाल्यांची याचिका फेटाळली होती.