परिविक्षाधीन ५८० पीएसआय कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 06:16 AM2017-08-18T06:16:04+5:302017-08-18T06:16:06+5:30

राज्यातील विविध पोलीस ठाण्यांत गेल्या वर्षभरापासून परिविक्षाधीन उपनिरीक्षक म्हणून कार्यरत ५८० अधिका-यांची कायमस्वरूपी नियुक्ती करण्यात आली.

Under the probation, 580 PSI | परिविक्षाधीन ५८० पीएसआय कायम

परिविक्षाधीन ५८० पीएसआय कायम

Next

मुंबई : राज्यातील विविध पोलीस ठाण्यांत गेल्या वर्षभरापासून परिविक्षाधीन उपनिरीक्षक म्हणून कार्यरत ५८० अधिका-यांची कायमस्वरूपी नियुक्ती करण्यात आली. त्यात सर्वाधिक २०५ उपनिरीक्षक मुंबई आयुक्तालयांतर्गत आहेत. पोलीस मुख्यालयातून त्यांच्या नियुक्तीचे आदेश नुकतेच बजाविण्यात आले.
राज्य लोकसेवा आयोगाच्या स्पर्धेद्वारे उपनिरीक्षक म्हणून उत्तीर्ण झालेल्या अधिकाºयांना नऊ महिने पोलीस अकादमीत प्रशिक्षण दिले जाते. त्यानंतर राज्यभरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये एक वर्षासाठी परिविक्षाधीन अधिकारी म्हणून काम करावे लागते. ५८० अधिकाºयांचा हा कालावधी पूर्ण झाल्याने त्यांची पूर्णवेळ अधिकारी म्हणून नियुक्ती केली. बहुतांश अधिकाºयांचे ते कार्यरत असलेल्या ठिकाणीच पोस्टिंग करण्यात आले आहे. मुंबईत २०५ तर ठाणे आयुक्तालयांतर्गत २५ अधिकाºयांची नियुक्ती केली आहे.

Web Title: Under the probation, 580 PSI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.