अमित शहांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात घडले सत्ता परिवर्तन, देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2022 11:04 AM2022-11-16T11:04:55+5:302022-11-16T11:06:35+5:30

Devendra Fadnavis : केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांच्या विचार पुष्पामध्ये कोणाचेही आयुष्य बदलण्याची क्षमता आहे. महाराष्ट्रातील सत्ता परिवर्तन देखील त्यांच्याच मार्गदर्शनाखाली झाले, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी येथे केले.

Under the guidance of Amit Shah, the transformation of power in Maharashtra took place, Devendra Fadnavis | अमित शहांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात घडले सत्ता परिवर्तन, देवेंद्र फडणवीस

अमित शहांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात घडले सत्ता परिवर्तन, देवेंद्र फडणवीस

Next

मुंबई : केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांच्या विचार पुष्पामध्ये कोणाचेही आयुष्य बदलण्याची क्षमता आहे. महाराष्ट्रातील सत्ता परिवर्तन देखील त्यांच्याच मार्गदर्शनाखाली झाले, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी येथे केले.

 अमित शहा यांच्या जीवनावरील आचार्य पवन त्रिपाठी लिखित पुस्तकाचे प्रकाशन फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. फडणवीस म्हणाले की, अमित शहा हे पक्षासाठी समर्पित नेतृत्व आहे. भाजप अध्यक्ष म्हणून त्यांचे कार्य आपण पाहिले आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतही राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून यूपीमध्ये त्यांचे कार्य आपण सर्वांनी पाहिले, जिथे भाजपला मोठ्या प्रमाणात जागा मिळाल्या. याचे श्रेय कोणाला जात असेल तर ते मोदीजींच्या नेतृत्वाला आणि अमित भाईंच्या कार्याला जाते. 

अमित भाई एका दिवसात ४०-४०बैठका घेऊन कार्यकर्त्यांपासून समाजातील प्रत्येक घटक आणि व्यक्तीपर्यंत पोहोचले. पक्षमजबूत करण्यासाठी ते जवळपास देशभर फिरले. प्रत्येक राज्यात त्यांनी अनेक दिवस मुक्काम केला. तसेच दोन-अडीच महिने महाराष्ट्रात राहून त्यांनी या कार्यालयातून निवडणूक प्रक्रिया हाताळली आणि भाजपचे सरकार आले

. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,  मंत्री मंगलप्रभात लोढा, अतुल सावे, मुंबई भाजप अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार, सहकार मंत्री अतुल सावे, आ. राजहंस सिंह आणि माधवी नाईक  उपस्थित होते.  यावेळी ‘फ्रेंड्स ऑफ बीजेपी’ या अभियानाचा प्रारंभ फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. 

दहा लाख लाभार्थींची पत्रे मोदींना पाठवली
घर, शौचालय, गॅस, पाणी यासारख्या सुविधा कोणत्याही भ्रष्टाचाराविना गोरगरीबांपर्यंत पोहचविल्या हे मोदी सरकारच्या कार्यपद्धतीचे वैशिष्ट्य आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. भाजपा प्रदेश कार्यालयात ‘धन्यवाद मोदीजी’ कार्यक्रमांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राज्यातील १० लाख लाभार्थ्यांची आभाराची पत्रे पाठवण्याच्या कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. 

Web Title: Under the guidance of Amit Shah, the transformation of power in Maharashtra took place, Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.