देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात मिळाले दैदिप्यमान यश

By मनोहर कुंभेजकर | Published: November 24, 2024 08:29 PM2024-11-24T20:29:52+5:302024-11-24T20:30:24+5:30

नवनिर्वाचित आमदारांचा कांदिवली पश्चिम येथील जिल्हा भाजप कार्यालयात सत्कार

Under the leadership of Devendra Fadnavis, great success in Maharashtra | देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात मिळाले दैदिप्यमान यश

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात मिळाले दैदिप्यमान यश

मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृह मंत्री अमित शाहा यांच्या नेतृत्वात मुबईसह संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी व रिपाई व मित्र पक्षांच्या महायुतीने न भुतो न भविष्यति असे २३३ जागा जिंकून जे दैदिप्यमान यश संपादन केले. त्या प्रित्यर्थ तसेच उत्तर मुंबई भाजपच्या वतीने ६ पैकी ५ जागा मोठया फरकाने जिंकत पुन्हा एकदा भाजपने आपली यशस्वी परंपरा कायम ठेवल्याबद्दल नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल व माजी खासदर गोपाळ शेट्टी यांच्या हस्ते पार पडला. कांदिवली पश्चिम येथील जिल्हा भाजप कार्यालयात काल सायंकाळी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

देवेंद्र फडणवीस यांनी २०१९ साली  भाजपाच्या १०० पेक्षा अधिक जागा निवडून आलेल्या असताना देखील पक्षाचा आदेश शिरसावंद्य मानत महाराष्ट्राच्या हितासाठी उपमुख्यमंत्री पद स्वीकारून महाराष्ट्राला अव्वल बनवले. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वात जे अभूतपूर्व यश संपादन केले तसेच राष्ट्राहितासाठी त्यांनी मुख्यमंत्री पदाचा देखील केलेला त्याग हे सर्व जनप्रतिनिधी व कार्यकर्त्यांना एक उदाहरण असल्याचे प्रतिपादन करत गोपाळ शेट्टी यांनी त्यांचे  कौतुक केले. 

युतीच्या शासन काळात महाराष्ट्रात सुरू असलेल्या विविध पायाभूत सुविधांचे जाळे, मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग,मेट्रो रेल्वे प्रकल्प, सागरी अटल सेतू मार्ग, कोस्टल रोड या सारख्या विविध योजना तसेच लाडकी बहिण -भाऊ योजना, शेतकरी सन्मान व मुंबई झोपडपट्टीमुक्त करण्याचा निर्धार या मुळेच महाराष्ट्राला या निवडणुकीत घवघवीत यश प्राप्त झाल्याचे प्रतिपादन शेट्टी यांनी केले. 

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल सर्व आमदार जनप्रतिनिधी यांना सोबत घेऊन येत्या ५ वर्षात उत्तर मुंबई झोपडपट्टीमुक्त करण्याचा संकल्प राबवावा. तसेच जनप्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी लगेच आगामी मुबई महानगपालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेउन कामाला लागावे असे आवाहन शेट्टी यांनी केले.

तसेच मालाड पश्चिम येथील ६ वी जागा फार कमी मतांच्या फरकाने हातून आपल्या हातून निसटल्याचे शल्य असल्याचे त्यांनी बोलून दाखवले.यावेळी उत्तर मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष गणेश खणकर, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Under the leadership of Devendra Fadnavis, great success in Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.