Join us

त्रिवार्षिक योजनेतून होणार ६० पाडे पाणीटंचाई मुक्त

By admin | Published: March 17, 2015 10:59 PM

जिल्ह्यातील शहापूर आणि मुरबाडमधील ९० गाव - पाडे पाणीटंचाई मुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने हालचाली सुरु करुन अपांरपारिक दृष्टीकोनाला प्राधान्य दिले आहे.

ठाणे : जिल्ह्यातील ग्रामीण भागात दरवर्षी उन्हाळयात पाणी टंचाईची झळ बसते. त्यातच जिल्ह्यातील शहापूर आणि मुरबाडमधील ९० गाव - पाडे पाणीटंचाई मुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने हालचाली सुरु करुन अपांरपारिक दृष्टीकोनाला प्राधान्य दिले आहे. यानुसार ६० पाड्यांसाठी त्रिवार्षिक योजना राबविण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला असून तीन टप्प्यात राबविण्यात येणाऱ्या योजनेच्या पहिल्या टप्प्यात २० पाडे पाणीटंचाई मुक्त केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.ठाणे हा धरणांचा जिल्हा ओळखला जातो. मात्र,याच जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील ९० गाव - पाडयांना आजही पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. हे गाव-पाडे प्रामुख्याने मुरबाड आणि शहापूर तालुक्यातील आहेत. त्यामुळे येथील रहिवाशांना दरवर्षी पाण्यासाठी पायपीट करावी लागते. मात्र,दुसरीकडे पाणीटंचाईवर मत करण्यासाठी विविध योजना राबविल्यानंतरही ती दूर झाली नाही. याचदरम्यान, जिल्हा परिषदेने यावर मत करण्यासाठी ९० पैकी ६० गावे-पाड्यांमध्ये सर्व्हे केला. त्या गावे-पाड्यांसाठी त्रिवार्षिक योजना राबविण्याचा निर्णय घेतला.अशाप्रकारे पहिल्या टप्प्यात २०१५ - १६ या वर्षात २० पाडे टंचाई मुक्त करण्याचा निर्णय घेतला असून त्यानंतर पुढील दोन टप्प्यात ४० पाडे पाणीटंचाई मुक्त होतील, अशी माहिती ठाणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी उदय चौधरी यांनी दिली. (प्रतिनिधी)३ मार्चमध्ये राज्यपाल सी. विद्यासागर हे ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी मुरबाड आणि शहापूरमधील ज्या वस्त्यांना टँकर्सने पाणीपुरवठा केला जातो,त्यांना टॅकरमुक्त करण्यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश त्यांनी दिले होते. त्यानंतर जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाल्याची चर्चा सुरु आहे.