Join us

“ज्याची कुवत सगळ्यात कमी लेखली गेली तोच पक्षाचा सर्वोच्च नेता अन् राज्याचा मुख्यमंत्री झाला”

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2020 10:07 AM

CM Uddhav Thackeray Interview: जनतेचा आशीर्वाद आहे ते महत्त्वाचं, मी आजही अत्यंत प्रामाणिकपणे सांगतो, आजदेखील सही आपला नम्र म्हणूनच करतो असं ते म्हणाले.

ठळक मुद्देकोणतीही जबाबदारी स्वीकारली ती पूर्णपणे प्राणपणाने पार पाडायचीमी अत्यंत प्रामाणिकपणे सांगतो, आजदेखील सही आपला नम्र म्हणूनच करतोयाची कुवत नाही, याला काही कळत नाही असं काही जण बोलायचे

मुंबई – मुख्यमंत्रीपदाबद्दलशिवसेनाप्रमुख म्हणायचे, काही गोष्टी येतात-जातात, कायमस्वरुपी आहे ते पक्षाचं प्रमुखपद, ते कायम आहे, हे पदही जोपर्यंत शिवसैनिकांचा विश्वास आहे तोपर्यंतच. त्यामुळे ते मी कधीच सोडणार नाही आणि पक्ष वाढवण्याचा प्रयत्न मी करणारच आहे जे सगळेच पक्ष करतात असा विश्वास मुख्यमंत्रीउद्धव ठाकरेंनी मुलाखतीत व्यक्त केला.

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, वयाच्या साठाव्या वर्षी मी जरी मुख्यमंत्री असलो तरी त्याच’साठी’ केला होता अट्टाहास असं नाहीय, हा निव्वळ योगायोग आहे, मला वाटतं, जगात माझंच एकमेव उदाहरण असेल की, ज्याची कुवत सगळ्यात कमी लेखली गेली तो पक्षाचा सर्वोच्च नेता झाला, याची कुवत नाही, याला काही कळत नाही असं काही जण बोलायचे पण तोच राज्याचा मुख्यमंत्री झाला. जनतेचा आशीर्वाद आहे ते महत्त्वाचं, मी आजही अत्यंत प्रामाणिकपणे सांगतो, आजदेखील सही आपला नम्र म्हणूनच करतो असं ते म्हणाले.(CM Uddhav Thackeray Interview)

त्याचसोबत ही बाळासाहेबांची पद्धत आहे, माझ्या आजोबांची पद्धत आहे. मुख्यमंत्री पदाचे म्हणाल तर या गोष्टी येतात-जातात. पण जनतेशी कायम नम्रपणे वागलं पाहिजे. मुख्यमंत्री असेन-नसेन पण कधीही कुठेही माँ आणि बाळासाहेबांचा मुलगा म्हणून तरी लोक हसून माझं स्वागत करतात. प्रेमाने आदरातिथ्य करतात. ही कमाई पूर्वजांच्या पुण्याईची आहे. माझं कर्तृत्व शून्य आहे. त्यावेळच्या शिवसैनिकांनी खस्ता खात शिवसेना पसरवली, बीजं पेरली, रुजवली आणि त्याला जे काही अंकुर आहेत ते मी आज बघतोय, त्यांचे योगदान मोठे आहे अशी भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.(CM Uddhav Thackeray Interview)

दरम्यान, कोणतीही जबाबदारी स्वीकारली ती पूर्णपणे प्राणपणाने पार पाडायची, जशी सामनाची असेल, संघटनेत शिस्त आणणं असेल किंवा यंत्रणा उभी करणं असेल, यातून हळूहळू काम करत करत मी मार्गक्रमण केले. सुरुवातीला मला भाषण करता येत नव्हतं आणि आत्ताही येत नाही. एकदा भाषण करण्यासाठी मी आधी लिहिलं, पाठ करुन गेलो आणि माईकसमोर उभा राहिल्यावर मला भाषणच आठवेना, पण त्या वेळेला मला जे सुचलं ते बोललो आणि त्याही भाषणाला टाळ्या मिळाल्या. असचं भाषण करुन मी इथपर्यंत आलो, म्हणजे एखाद्या गोष्टीचा तुम्हाला अनुभव असायलाच पाहिजे असं नाही, तुमच्या ह्दयात, अंत:करणात तळमळ पाहिजे, ती महत्त्वाची आहे असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

तुकाराम मुंढेंना 'फुल सपोर्ट'; उद्धव ठाकरेंची 'जन की बात'

मी कोणाच्या उज्ज्वल भवितव्याच्या आड येत नाही, पण...; उद्धव ठाकरेंचा नेम अजित पवारांवर?

"अयोध्येला जाणार, राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात सहभागी होणार!" पण...

पाहा व्हिडीओ

 

टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेनामुख्यमंत्री