Join us

भुयारी मेट्रो मार्ग ३ चे काम सुपर फास्ट; स्थानकांचे काम पुर्णत्त्वाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2021 4:09 AM

मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो मार्ग ३ चे काम वेगाने सुरु असून, आजघडीला या मार्गातील बहुतांशी स्थानकांचे काम ...

मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो मार्ग ३ चे काम वेगाने सुरु असून, आजघडीला या मार्गातील बहुतांशी स्थानकांचे काम पूर्णत्वाच्या जवळपास आले आहे. विशेषत: कोरोना काळात देखील मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने आपल्या कामाचा वेग कायम ठेवत स्थानकाचे काम मार्गी लावण्यावर भर दिला आहे.

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार, कफ परेड ७८ टक्के, विधानभवन ८३, चर्चगेट ८०, काळबादेवी २९, सीएसटी ७६, हुतात्मा चौक ८०, गिरगाव २९, ग्रँटरोड ३६, मुंबई सेंट्रल ७८, महालक्ष्मी ७७, सायन्स म्युझियम ७३, आचार्य अत्रे चौक ४३, वरळी, ६८, सिद्धिविनायक ८०, दादर ६८, शीतलादेवी ५५, धारावी ७३, बीकेसी ७०, विद्यानगरी ७४, सांताक्रूझ ७७, विमानतळ ७७, मरोळ ८२, विमानतळ ७६, सहार रोड ७६, एमआयडीसी ८५, सीप्झ मेट्रो स्थानकाचे काम ८३ टक्के काम झाले आहे.