ठाण्यात आता अंडरग्राऊंड पार्कीग हब
By Admin | Published: November 25, 2014 11:03 PM2014-11-25T23:03:37+5:302014-11-25T23:03:37+5:30
दिवसेंदिवस वाहतूककोंडीची समस्या वाढत असूनही महापालिकेला शहरातील पार्कीगवर योग्य तो तोडगा काढता आलेला नाही. परिणामी या समस्येत भर पडत आहे.
अजित मांडके ल्ल ठाणो
दिवसेंदिवस वाहतूककोंडीची समस्या वाढत असूनही महापालिकेला शहरातील पार्कीगवर योग्य तो तोडगा काढता आलेला नाही. परिणामी या समस्येत भर पडत आहे. त्यामुळे आता शहरासाठी पार्कीग धोरण राबवितानाच स्टेशन परिसरातून हाकेच्या अंतरावर असलेल्या गावदेवी मैदानाच्या खाली (बेसमेंट) पालिकेने पार्कीग सुरु करण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. पालिकेच्या प्राथमिक अंदाजानुसार येथे 5क्क् गाडय़ांचे पार्कींग होऊ शकणार आहे.
पालिकेचे नवीन पार्कीग धोरण देखील अद्याप कागदावरच आहे. परंतु, ते राबविले तर शहरातील पार्कीगची समस्या ही पूर्णपणो मार्गी लागेलच याची शाश्वती पालिकेला नाही. त्यातच स्टेशन परिसरात कुठेही पार्कीगची सुविधा नसल्याने त्या भागात कुठेही अन कशाही पध्दतीने वाहने पार्क केली जात आहेत. त्यामुळे तेथे सकाळ, संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेस वाहतूककोंडी होताना दिसते. त्यामुळे गावदेवी मंडईची निर्मिती झाल्यानंतर येथे पार्कीगची सुविधा सुरु करण्यासाठी पालिकेच्या हालचाली सुरु होत्या. त्या सध्या कागदावरच आहेत. परंतु आता या मैदानाच्या खालीच बेसमेंटमध्ये पार्कीगची सुविधा उपलब्ध करुन देण्याचा आराखडा पालिकेकडून आखला जात आहे. तळ अधिक एक अथवा दोन मजल्याचे पार्कीग करण्याचा प्रशासनाचा मानस आहे. त्यादृष्टीने आता हालचाली सुरु झाल्या असून यासाठी तज्ज्ञ सल्लागार नेमण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या सल्लागारामार्फत, या मैदानाची कप्ॅासिटी किती आहे, त्याठिकाणी एन्ट्री कुठे आणि एक्झीट कुठे असावी, कशाप्रकारे वाहने पार्क केली जाऊ शकतात, किती गेट ठेवावेत, मैदानाचे अस्तित्व संपुष्टात येऊ नये यासाठी काय करता येईल, असा सर्वसमावेशक अभ्यास सुरु झाला आहे. याठिकाणी 5क्क् वाहने पार्क होऊ शकतील एवढी कॅपीसीटी होण्याची शक्यता आहे.
शहरातील मुख्य मैदान म्हणून गावदेवी मैदानाची ओळख आहे. पूर्वी या ठिकाणी बाळासाहेब ठाकरेंसारख्या अनेक दिग्गज राजकीय नेत्यांच्या सभा गाजल्या. तसेच, क्रीडारसिकांसाठी खेळासाठी हे एकमेव मैदान म्हणूनही नावाजले आहे. परंतु, गेल्या काही वर्षात या मैदानात खेळ कमी व इतर कार्यक्रमानीच हे ते हाऊसफुल्ल झाल्याचे चित्र दिसत होते. मधल्या काळात या मैदानाचा वापर केवळ पार्कीगसाठी होऊ लागल्याने क्रीडा प्रेमींमध्ये नाराजीचा सुूर होता. दरम्यान, आजही या मैदानात एकाबाजूला पार्कीग सुरु असून दुस:या बाजूला भाजी मंडईचा विळखा आहे. तसेच विविध कार्यक्रमांची रेचलेच सुरु असल्याचे चित्र आहे.
गेल्या काही वर्षात ठाण्यात वाहनांच्या संख्येत दुपटीने वाढ झाल्याने शहरात पार्कीगची समस्या निर्माण झाली आहे. पालिकेने नेमलेल्या ठेकेदाराचा पार्कीगचा ठेकाही काही वर्षापूर्वी संपला आहे.
स्टेशन परिसरात पश्चिमेला दुचाकीसाठी आता पार्कीगची सुविधा उपलब्ध होणार येथे देखील 2क्क्क् दुचाकी पार्क होऊ शकणार आहेत. त्यादृष्टीनेही पालिकेने अभ्यास सुरु केला आहे. सध्या येथे रेल्वेच्या जागेत दुचाकींची पार्कीग सुरु आहे. परंतु, येत्या काही काळात पालिकाही येथे पार्कीगची सुविधा उपलब्ध करुन देणार आहे.