कफ परेड ते सीएसएमटी स्थानकपर्यंतचे भुयारीकरण १०० टक्के पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:06 AM2021-06-02T04:06:27+5:302021-06-02T04:06:27+5:30
कुलाबा-वांद्रे-सीप्झ भुयारी मेट्रो-३ लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनद्वारे कफ परेड ते सीएसएमटी स्थानकापर्यंतचे भुयारीकरण ...
कुलाबा-वांद्रे-सीप्झ भुयारी मेट्रो-३
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनद्वारे कफ परेड ते सीएसएमटी स्थानकापर्यंतचे भुयारीकरण पूर्ण करण्यात आले. भुयारीकरणाचा हा ३८वा टप्पा यशस्वीरीत्या पार पडला. हुतात्मा चौक ते सीएसएमटी हा अप लाइन मार्गाचा ५५७ मीटर भुयारीकरणाचा टप्पा १४९ दिवसात पूर्ण झाला. या भुयारीकरण टप्प्यासह पॅकेज-१मधील भुयारीकरण १०० टक्के पूर्ण झाले आहे.
सूर्या-१ या टनेल बोअरिंग मशीनद्वारे भुयारीकरण पूर्ण करण्यात आले आहे. भुयारीकरणामुळे मेट्रो-३च्या सातपैकी सहा पॅकेजचे १०० टक्के भुयारीकरण पूर्ण झाले. दरम्यान, मेट्रो-३ प्रकल्पाचे आतापर्यंत एकूण ५२ किमी म्हणजेच ९६ टक्के भुयारीकरण पूर्ण झाले आहे.
* कौशल्यपूर्ण पद्धतीने केले काम पूर्ण
ऐतिहासिक वारसा इमारतीनजीक भुयारीकरण करणे हे अनेक आव्हानांपैकी एक होते. मात्र सर्व सुरक्षेविषयक दक्षता घेत हे काम कौशल्यपूर्ण पद्धतीने पूर्ण केले याचा आनंद वाटतो.
- रणजित सिंह देओल, व्यवस्थापकीय संचालक, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन
* भुयारीकरणाचा तपशील
१) कफ परेड ते विधान भवन (अप लाइन १२२८ मीटर, डाऊन लाइन १२५४ मीटर)
२) विधान भवन ते चर्चगेट अप लाइन ४९८ मीटर, डाऊन लाइन ४८१ मीटर)
३) चर्चगेट ते हुतात्मा चौक (अप लाइन ६५४ मीटर)
४) हुतात्मा चौक ते सीएसएमटी (अप लाइन ५५७ मीटर, डाऊन लाइन ५६९ मीटर)