अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलच्या मोठ्या बहिणीचा कोरोनामुळे मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 12:42 PM2020-06-16T12:42:25+5:302020-06-16T12:43:13+5:30

छोटा शकीलच्या लहान बहिणीला ह्रदयविकाराचा झटका आल्याने तिचा मृत्यू झाला होता.

Underworld criminal Chhota Shakeel's elder sister dies due to corona | अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलच्या मोठ्या बहिणीचा कोरोनामुळे मृत्यू

अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलच्या मोठ्या बहिणीचा कोरोनामुळे मृत्यू

Next

मुंबई - अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलच्या लहान बहिणीचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. ठाण्यातील मुब्रा येथील रुग्णालयात हमीदा यांच्यावर उपचार सुरु होते. हमीदा यांना काही दिवसांपूर्वीच कोरोनाची लागण झाली होती. गेल्याच महिन्यात छोटा शकीलच्या आणखी एका बहिणीचा मृत्यू झाला होता. फहमीदा असे त्यांचे नाव होता. त्यामुळे, एकाच महिन्यात दोन्ही बहिणींच्या मृत्युचं दु:ख शकीलच्या कुटुंबीयांस आहे. 

छोटा शकीलच्या लहान बहिणीला ह्रदयविकाराचा झटका आल्याने तिचा मृत्यू झाला होता. फहमीदा या मुंबईतील मीरा रोड परसरात आपल्या कुटुंबासमवेत राहत होत्या. तर, शकीलची मोठी बहिण कोठे राहते, याबाबत माहिती नाही. मात्र, मुंब्रा येथील रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाचे संकट गडद होत असून सोमवारी एकाच दिवसात 178 जणांचा मृत्यू झाला आहे. एका दिवसात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्युंचा हा राज्यातील सर्वात मोठा आकडा ठरला आहे. तर, राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 1 लाख 10 हजार 744 पर्यंत पोहचली असून 4128 जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे. 

कोण आहे छोटा शकील?
छोटा शकील हा ६० च्या दशकात मध्य मुंबईत टॅक्सी चालविण्याचं काम करत होता. त्यानंतर, 1980 साली तो अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या गँगमध्ये सामिल झाला. मुंबईतील १९९३ च्या बॉम्बस्फोट हल्ल्याच्या कटातही तो सहभागी होता.  
 

Read in English

Web Title: Underworld criminal Chhota Shakeel's elder sister dies due to corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.