मुंबईतील बांधकाम व्यवसायात अंडरवर्ल्डचा पैसा

By admin | Published: March 18, 2015 02:20 AM2015-03-18T02:20:51+5:302015-03-18T10:56:19+5:30

मुंबईतील झोपडपट्टी पुनर्विकास योजनेसह (एसआरए) बांधकाम व्यवसायात मोठ्या प्रमाणात अंडरवर्ल्डचा पैसा गुंतवला जात असल्याची धक्कादायक माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.

Underworld Money in Building Building in Mumbai | मुंबईतील बांधकाम व्यवसायात अंडरवर्ल्डचा पैसा

मुंबईतील बांधकाम व्यवसायात अंडरवर्ल्डचा पैसा

Next

मुख्यमंत्र्यांची धक्कादायक माहिती : गुंतवणुकीवर गृह विभाग लक्ष ठेवून
मुंबई : मुंबईतील झोपडपट्टी पुनर्विकास योजनेसह (एसआरए) बांधकाम व्यवसायात मोठ्या प्रमाणात अंडरवर्ल्डचा पैसा गुंतवला जात असल्याची धक्कादायक माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. कायदा व सुव्यवस्थेवरील चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते.
याबाबतची सर्व माहिती गृह विभागाला मिळाली असून, त्याच्या आधारे लक्ष ठेवले जात आहे. परदेशातातून अंडरवर्ल्डच्या कारवाया सध्या सुरू आहेत. बांधकाम व्यवसायात पैसा गुंतवला जात आहे. या माहितीची दखल घेत या प्रवृत्तींच्या मागे पोलीस खाते लागले आहे. यातील आरोपी जरी विदेशात असतील तरी त्यांचे कंबरडे मोडल्याशिवाय राहणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. विरोधी पक्षांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्था स्थितीबाबत चर्चा उपस्थित केली होती. कायदा व सुव्यवस्था स्थिती ढासळल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी फेटाळून लावला.
एसआरएमध्येही अंडरवर्ल्डचा पैसा येत आहे. त्यानुसार एसआरएच्या नियमांतही बदल केले जातील. हा पैसा मुंबईत गुंतवून नंतर त्यातून मिळणाराच पैसा आपल्या देशाविरुद्ध देशविघातक कारवायांसाठी वापरला जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

च्महिलांच्या तक्र ारी घेण्यासाठी प्रत्येक पोलीस स्थानकात महिला पोलीस नेमणार
च्माहिती अधिकार कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या सुरक्षा आॅडिट करणार
च्मोहल्ला, शांतता आणि तंटामुक्ती समित्या बरखास्त करणार

च्जातपंचायती रोखण्यासाठी नवा सक्षम कायदा आणणार
च्लोणावळा बलात्कार खून प्रकरणीचा मुख्य आरोपी बिहारमध्ये
च्जातीयवादी संघटना मग ती कोणतीही असली तरी कारवाई करणार
च्कुंभमेळ्यासाठी भाड्याने सीसीटीव्ही कॅमेरे घेणार

पानसरेंच्या हत्येचा तपास सीबीआयकडे नाही
कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास सीबीआयकडे सोपविला जाणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. आरोपींना पकडले जातील. पोलिसांना थोडा वेळ द्यावा लागेल. परदेशी फॉरेन्सिक तज्ज्ञांचीही मदत घेतली जात आहे. हत्येचे काही धागेदोरे मिळाले आहेत. मात्र लगेचच आरोपी भेटतील, असे नाही. सीसीटीव्ही फूटेजही परदेशात तपासणीसाठी पाठवण्याची तयारी सरकारने केली आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

Web Title: Underworld Money in Building Building in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.