Join us

सीसीटीव्ही यंत्रणा पूर्ववत करा

By admin | Published: November 13, 2014 12:46 AM

प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून एनएमएमटीच्या बसेसमधील सीसीटीव्हीची यंत्रणा पूर्ववत करा, असे निर्देश आमदार संदीप नाईक यांनी एनएमएमटी प्रशासनाला दिले आहेत.

नवी मुंबई : प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून एनएमएमटीच्या बसेसमधील सीसीटीव्हीची यंत्रणा पूर्ववत करा, असे निर्देश आमदार संदीप नाईक यांनी एनएमएमटी प्रशासनाला दिले आहेत. यात  नादुरुस्त कॅमेरे दुरुस्त करा, ज्या बसेसमधून कॅमेरे चोरीला गेले आहेत, त्याठिकाणी नवीन बसवण्याच्या सूचनाही नाईक यांनी दिल्या.
एनएमएमटीच्या बसेसमधील सीसीटीव्ही गायब झाल्याचे वृत्त लोकमतच्या 11 नोव्हेंबरच्या अंकात प्रसिध्द करण्यात आले होते. याची दखल घेत आमदार नाईक यांनी बुधवारी सकाळी तुर्भे डेपोला भेट दिली. यावेळी व्हॉल्वो बसेसमधील सीसीटीव्ही यंत्रणा सुस्थितीत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. मात्र साध्या आणि मिनी यातील अनेक बसेसमधून कॅमेरे गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या बसमधून प्रवास करणारे काही विघ्न संतोषी प्रवासी अनेकदा कॅमे:याची वायर तोडतात किंवा त्यातील चिप काढून नेत असल्याचे एनएमएमटीचे प्रभारी व्यवस्थापक शिरीष आरदवाड यांनी आ. नाईक यांच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी आ. नाईक यांनी खारफुटीमुळे अर्धवट अवस्थेतील घणसोली पामबीच मार्गाची पाहणी व   अम्युजमेंट पार्कच्या कामाचाही आढावा घेतला. (प्रतिनिधी)