'गेल्या 4 वर्षात बेरोजगारी जास्तच वाढली, 15 लाख ही जुमलेबाजीच'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2019 10:29 AM2019-04-02T10:29:47+5:302019-04-02T10:44:27+5:30
ठाकरे जुमलेबाजी करत नाहीत. पण राजकारणामध्ये जुमलेबाजीला महत्त्व आलंय किंवा जुमलेबाजीवर निवडणुका जिंकल्या जातात असा टोला उद्धव ठाकरेंनी भाजपाला लगावला.
मुंबई - गेल्या चार वर्षांत अनेक मुद्दय़ांवर शिवसेनेने सरकारला धारेवर धरलंत. आजही बेकारीचा प्रश्न तसाच आहे. किंबहुना गेल्या चार वर्षांत बेरोजगारी सर्वात जास्त वाढली. 45 टक्क्यांपेक्षाही जास्त बेरोजगारीचं प्रमाण आहे. अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारवर केली. सामना दैनिकाला मुलाखत देताना उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे भारतीय जनता पार्टीवर टीका केली आहे.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपाकडून निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांचा समाचार घेतला. लोकांच्या अपेक्षा खूप मोठय़ा असू शकतात. त्यांच्या अपेक्षांना आपण किती सत्य स्वरूपात आणि मूर्त स्वरूपात आणू शकतो हे कळतं आणि तेवढय़ापुरतंच बोलावं जे आपण करू शकतो. 15 लाख रुपये जेव्हा आपण प्रत्येक नागरिकाला द्यायची घोषणा करतो. जी पूर्ण होऊ शकत नाही. अवाजवी घोषणा करू नयेत. लोकांना नेहमी खरं बोललेलं आवडतं. एखादी अवाजवी गोष्ट सांगितली आणि ती पूर्ण करू शकलो नाही तर लोकांचा असंतोष वाढत जातो. ठाकरे जुमलेबाजी करत नाहीत. पण राजकारणामध्ये जुमलेबाजीला महत्त्व आलंय किंवा जुमलेबाजीवर निवडणुका जिंकल्या जातात असा टोला उद्धव ठाकरेंनी भाजपाला लगावला.
काँग्रेसमुक्त देश असं बोलतच नाही
याचसोबत नरेंद्र मोदी आणि भाजपाकडून काँग्रेसमुक्त भारत अशी घोषणा दिली जाते. त्यावर उद्धव ठाकरेंनी टीका करत म्हणाले की, मी काँग्रेसमुक्त देश असं बोलतच नाही. मी काँग्रेस नष्ट करा असं कधी बोलत नाही. कारण विरोधी पक्ष राहिलाच पाहिजे, कुणालाही नष्ट करा असं मी कधी म्हणत नाही, नष्ट करा किंवा काँग्रेसमुक्त करा या अशा फालतू कल्पना माझ्याकडे नाहीत अशी टीका उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदींवर केली आहे.
'...जर आम्ही वेगळे लढलो असतो तर नुकसान झालं असतं'
...तर मी पुन्हा अयोध्येत जाईन, उद्धव ठाकरेंचा इशारा
पाहा व्हिडीओ