अनैतिक प्रेमसंबंध बेतले जीवावर; बेदम मारहाणीमुळे तरुणाचा मृत्यू, भांडुपमधील घटना

By मनीषा म्हात्रे | Published: October 7, 2022 11:07 PM2022-10-07T23:07:24+5:302022-10-07T23:08:43+5:30

भांडुप पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किशोर भुडकु पटाईत (५५ ) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवत अधिक तपास करत आहे. २६ सप्टेंबर रोजी मुलीकडून सूरजला मारहाण झाल्याचे समजले.

Unethical love affairs lead to death; Death of youth due to brutal beating, incident in Bhandup | अनैतिक प्रेमसंबंध बेतले जीवावर; बेदम मारहाणीमुळे तरुणाचा मृत्यू, भांडुपमधील घटना

अनैतिक प्रेमसंबंध बेतले जीवावर; बेदम मारहाणीमुळे तरुणाचा मृत्यू, भांडुपमधील घटना

Next

मुंबई : पत्नीच्या अनैतिकसंबंधाबाबत समजताच पतीने प्रियकराला एका खोलीत बोलावून लाथाबुक्क्यांसह लाकडी बांबू, पट्याने बेदम मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या प्रियकर तरुणाचा आठवड्याभराच्या उपचारानंतर मृत्यू झाल्याची घटना भांडुपमध्ये घडली आहे. याप्रकरणी भांडुप पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा नोंदवत दोघांना अटक केली आहे.

भांडुप पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किशोर भुडकु पटाईत (५५ ) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवत अधिक तपास करत आहे. २६ सप्टेंबर रोजी मुलीकडून सूरजला मारहाण झाल्याचे समजले. सुरजचा काही इसमासोबत वाद झाला होता. उपचाराकरीता त्याला मुलुंड जनरल रुग्णालय येथे दाखल केले असून त्याची तब्येत सध्या बरी आहे. त्यांनी भावाला याबाबत कळवताच त्याने सूरजची भेट घेतली. सुरजकडे केलेल्या चौकशीत  त्यांचे एका महिलेसोबत प्रेमसंबंध होते. याबाबत तिचा पती अविनाश तोरणेला कळाल्याने त्याने प्रतापनगर येथे बोलावून घेतले. तेथे त्याच्यासह अश्विन तोरणे व रुपेश भिसे यांनी लाकडी बांबू, चामडयाचा पट्टा व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. बदनामीच्या भीतीने तक्रार दिली नसल्याचे सांगितले.

सुरज हा मुलुङ जनरल रुग्णालय येथे उपचार घेत असताना तेथे सोनोग्राफीची सुविधा नसल्याने २६ सप्टेंबर रोजी रात्री सायन रुग्णालय येथे उपचाराकरीता दाखल केले होते. तेथे त्याचा एक्सरे व सोनोग्राफी काढण्यात आला होता. एक्सरेमध्य  त्याच्या डाव्या हाताच्या मनगटास फ्रैक्चर झाल्याचे स्पष्ट झाले होते. दुसऱ्या दिवशी त्याला डिस्चार्ज दिला.

तेथून त्याला रायगडला गावी नेले. तेथे काहीही खाल्ले तर सुरजने उलटी करण्यास सुरुवात केली. ३० तारखेपासून त्याला श्वास घेण्यास त्रास झाल्याने तेथील स्थानिक रुग्णालयात दाखल केले. सोनोग्राफीत पोटात पाणी झाल्याचे सांगितले. तेथून त्याला सायन रुग्णालयात आणले. तेथे व्हेंटिलेटरवर असलेल्या सुरजचा ४ ऑकटोबर रोजी मृत्यू झाला. या घटनेने त्याच्या कुटुंबियांना धक्का बसला आहे. याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवत अविनाश अशोक तोरणे ( ३१ ), अश्विनः अशोक तोरणे (२६ ) यांना अटक केली असून पाहिजे आरोपी रुपेश भिसे याचा शोध सुरु असल्याचे सांगितले.

Web Title: Unethical love affairs lead to death; Death of youth due to brutal beating, incident in Bhandup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.