असशील सेलिब्रिटी, पण अलिबाग तुझ्या मालकीचे नाही! आमदार जयंत पाटलांनी शाहरुख खानला सुनावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 06:31 AM2017-11-12T06:31:00+5:302017-11-12T06:31:00+5:30

किंगखान अर्थात शाहरुख खानचा अलिबाग दौरा वादाचा विषय ठरला आहे. आपला वाढदिवस साजरा करून मुंबईला परतलेल्या शाहरुखच्या बोटीमुळे, शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांना गेटवे आॅफ इंडिया येथे ताटकळत राहावे लागले.

Unhealthy celebrity, but Alibag is not yours! MLA Jayant Patil told Shahrukh Khan | असशील सेलिब्रिटी, पण अलिबाग तुझ्या मालकीचे नाही! आमदार जयंत पाटलांनी शाहरुख खानला सुनावले

असशील सेलिब्रिटी, पण अलिबाग तुझ्या मालकीचे नाही! आमदार जयंत पाटलांनी शाहरुख खानला सुनावले

Next

मुंबई : किंगखान अर्थात शाहरुख खानचा अलिबाग दौरा वादाचा विषय ठरला आहे. आपला वाढदिवस साजरा करून मुंबईला परतलेल्या शाहरुखच्या बोटीमुळे, शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांना गेटवे आॅफ इंडिया येथे ताटकळत राहावे लागले. यामुळे संतप्त झालेल्या जयंत पाटील यांनी, ‘तू अलिबाग विकत घेतले नाहीस... माझ्या परवानगीशिवाय तू अलिबागला येऊ शकत नाहीस...’ असे शाहरुखला सुनावले.
शाहरुख खानने ३ नोव्हेंबर रोजी अलिबागमधील फार्महाउसवर वाढदिवस साजरा केला. त्यानंतर, तो बोटीने अलिबागवरून मुंबईला परतला. त्याची बोट गेटवेच्या जेट्टीवर पोहोचली, तेव्हा बराच वेळ शाहरुख बोटीतच बसून राहिला. शाहरुख आल्याचे समजताच, जेट्टीजवळ त्याच्या चाहत्यांनी गर्दी केली होती.

शाहरूखने काहीच दिली नाही प्रतिक्रिया
पोलिसांनी शाहरुखमुळे जेट्टीवर प्रवाशांना थांबवून ठेवले होते. अलिबागला बोटीने निघालेल्या पाटील यांनाही ताटकळत राहावे लागले. त्यामुळे त्यांचा पारा चढला. त्यांनी त्यांची बोट शाहरुखच्या बोटीजवळ नेली आणि ‘असशील तू मोठा स्टार.. म्हणून काय तू अलिबाग विकत घेतले नाहीस, माझ्या परवानगीशिवाय तू अलिबागला येऊ शकत नाहीस,’ असे सुनावले.
मात्र, शाहरुखने काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही. पाटील अलिबागकडे निघाले, तेव्हा शाहरुख बोटीतून बाहेर आला आणि गर्दीला हात उंचावून दाखवत निघून गेला.काहींनी या घटनेचा शूट केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Web Title: Unhealthy celebrity, but Alibag is not yours! MLA Jayant Patil told Shahrukh Khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.