विनाहेल्मेट सुसाट प्रवास

By admin | Published: October 17, 2015 02:24 AM2015-10-17T02:24:53+5:302015-10-17T02:24:53+5:30

विनाहेल्मेट प्रवास करणे हा दंडनीय गुन्हा असूनही अनेक बाइकस्वारांकडून या नियमाला बगल दिली जात असल्याचे समोर आले आहे. २0११ ते २0१५ (सप्टेंबरपर्यंत) तब्बल ११ लाख ९३ हजार

Unhealthy Succession Travel | विनाहेल्मेट सुसाट प्रवास

विनाहेल्मेट सुसाट प्रवास

Next

मुंबई : विनाहेल्मेट प्रवास करणे हा दंडनीय गुन्हा असूनही अनेक बाइकस्वारांकडून या नियमाला बगल दिली जात असल्याचे समोर आले आहे. २0११ ते २0१५ (सप्टेंबरपर्यंत) तब्बल ११ लाख ९३ हजार ७३६ बाइकस्वारांनी विनाहेल्मेट प्रवास केल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई केल्यानंतरही बाइकस्वारांकडून विनाहेल्मेटच प्रवास केला जात आहे.
वाहतूक नियमानुसार बाइकस्वाराने हेल्मेट घालून बाइक चालविली पाहिजे. मात्र बाइकस्वारांकडून या नियमाचे सर्रास उल्लंघनच केले जाते आणि विनाहेल्मेट प्रवास केला जातो. एखादा अपघात झाल्यास आणि हेल्मेट नसल्यास डोक्याला मार लागून बाइकस्वाराला मृत्यूलाही सामोरे जावे लागते. त्यामुळे हेल्मेट घालून प्रवास करा, असे आवाहन वारंवार करूनही बाइकस्वार त्याकडे दुर्लक्ष करताना दिसतात. २0११ ते २0१५ पर्यंत (सप्टेंबर महिन्यापर्यंत) मुंबई शहर आणि उपनगरात विनाहेल्मेट प्रवासाच्या एकूण ११ लाख ९३ हजार ७३६ केसेस वाहतूक पोलिसांकडून नोंद करण्यात आल्या आहेत. त्यांच्यावर केलेल्या दंडात्मक कारवाईतून एकूण १0 कोटी ४२ हजार दंड वसूल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. (प्रतिनिधी)
>>चर्चगेट, ग्रॅन्ट रोड, मुंबई सेंट्रल, सीएसटी परिसर, भायखळा, सॅन्डहर्स्ट रोड, दादर, वांद्रे पश्चिम, सांताक्रूझ, लोअर परेल, सायन, कुर्ला, अंधेरी ते बोरीवली, घाटकोपर, भांडुप, मुलुंड या परिसरात मोठ्या प्रमाणात विनाहेल्मेट प्रवास होताना दिसतो.
वाहतूक पोलिसांकडून कारवाई जरी केली जात असली तरी पुन्हा तीच परिस्थिती दिसून येते. विनाहेल्मेट प्रवास करणे गुन्हा आहे आणि त्याचबरोबर अपघातांनाही निमंत्रण देऊ शकता, असे आवाहन करतानाच जनजागृतीही केली जाते. कॉलेज आणि शाळांमधून मोठ्या प्रमाणात वाहतूक पोलिसांकडून जनजागृती करण्यात आलेली आहे.

Web Title: Unhealthy Succession Travel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.