युनिफॉर्म, गारमेंट प्रदर्शन १७ डिसेंबरपासून मुंबईत; राज्यात नवे २,५00 कारखाने उभारणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2019 04:38 AM2019-12-05T04:38:58+5:302019-12-05T04:40:04+5:30

मुंबई : सोलापूर गारमेंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनतर्फे चौथे युनिफॉर्म, गारमेंट अँड फॅब्रिक मॅनुफॅक्चरर्स फेअर हे प्रदर्शन मुंबईच्या गोरेगावातील एक्झिबिशन सेंटरमध्ये ...

Uniform, Garment Exhibition in Mumbai from December 1; 1,500 new factories to be set up in the state | युनिफॉर्म, गारमेंट प्रदर्शन १७ डिसेंबरपासून मुंबईत; राज्यात नवे २,५00 कारखाने उभारणार

युनिफॉर्म, गारमेंट प्रदर्शन १७ डिसेंबरपासून मुंबईत; राज्यात नवे २,५00 कारखाने उभारणार

googlenewsNext

मुंबई : सोलापूर गारमेंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनतर्फे चौथे युनिफॉर्म, गारमेंट अँड फॅब्रिक मॅनुफॅक्चरर्स फेअर हे प्रदर्शन मुंबईच्या गोरेगावातील एक्झिबिशन सेंटरमध्ये १७ ते १९ डिसेंबर २०१९ या काळात भरविले जाईल. महाराष्ट्राला जगातील गणवेश निर्मितीचे केंद्र बनविण्याच्या हेतून याचे आयोजन केले आहे.
महाराष्ट्रात पाच वर्षांत गणवेशांचे २,५00 नवे कारखाने उभे करण्याचा प्रयत्न असून, भव्य गारमेंट पार्कही उभारण्यात येणार आहे. त्याला सरकारच्या वस्त्रोद्योग विभागाचे साह्य मिळणार आहे, असे आयोजक नीलेश शहा म्हणाले. प्रदर्शनाला देशातील १0 हजार घाऊ क व किरकोळ व्यापारी, वितरक, ई-कॉमर्स कंपन्या व डीलर्स येतील, अशी अपेक्षा आहे. मॉरिशस, केनिया, दुबई, ओमान, नायजेरिया, घाना, युगांडा, बहारिन, व्हिएटनाम, कतार सेनेगल या देशांतील प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.
प्रदर्शनात गणवेश, त्याचे कापड, पुरुष, स्त्रिया व मुलांचे कपडे, बूट उत्पादक तसेच गणवेशाचे कापड ठेवले जाणार आहेत.

सर्व प्रकारचे गणवेश
शाळा, कंपन्या, रुग्णालये, हॉटेल कारखाने, कंपन्या, सरकारी क्षेत्रांमधील कर्मचाऱ्यांचे गणवेश इथे पाहता येतील. या माध्यमातून अधिकाधिक रोजगारनिर्मिती व्हावी आणि गुंतवणूक वाढावी, असा प्रयत्न असल्याचे सहसचिव प्रकाश पवार यांनी सांगितले.

Web Title: Uniform, Garment Exhibition in Mumbai from December 1; 1,500 new factories to be set up in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.