Join us

सहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर एसटी कर्मचाऱ्यांना गणवेश; मुंबईतील ९३२ वाहक-चालकांना वितरण सुरू 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2024 11:29 AM

सहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर एसटी कामगारांना गणवेशाचे कापड मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

मुंबई : सहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर एसटी कामगारांना गणवेशाचे कापड मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महामंडळाने कर्मचाऱ्यांना गणवेश वाटप सुरू केले आहे. मुंबईतील विविध आगारांतील चालक, वाहकांसह ९३२ जणांना गणवेश दिला जाणार आहे. 

सन २०१९ पासून कर्मचाऱ्यांना गणवेश देण्यात आला नव्हता. त्यामुळे त्यांना पदरमोड करून गणवेश खरेदी करावा लागत होता. गणवेश देण्याची मागणी कामगार संघटनांनी लावून धरली होती. आगारातील चालक आणि वाहकांनाही गणवेशाचे वाटप सुरू करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

गणवेशाचे पैसे कधी मिळणार?

गेली सहा वर्षे कर्मचारी स्वखर्चाने गणवेश घेत होते. त्याचे पैसे त्यांना अद्याप मिळालेले नाहीत. ते त्यांना देण्यात यावेत, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे. 

‘ड्रेसकोड’ संकल्पना फसली-

१) कर्मचाऱ्यांना यापूर्वी कापड आणि शिलाई भत्ता मिळत होता. मात्र २०१९ मध्ये राज्य सरकारने कर्मचाऱ्यांसाठी ‘ड्रेसकोड’ची संकल्पना आणली. 

२) मात्र, हा निर्णय फसला. त्यानंतर सहा वर्षे कर्मचारी स्वत: च गणवेशाचा खर्च करीत होते.

चालक, वाहकांची संख्या-

आगार                      चालक           वाहकमुंबई सेंट्रल                   ९८                  ७५ परळ                           १५८                ४८ कुर्ला नेहरूनगर          ११३                 ६७  पनवेल                        १२०                 ९२ उरण                           ९१                  ७० एकूण                          ५८०               ३५२ 

टॅग्स :मुंबईराज्य सरकार