महावितरण; डोलवी येथील विद्युत यंत्रणेचा घेतला आढावा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाच्या संकट काळात जे. एस. डब्ल्यू. या अतिउच्चदाब वीज ग्राहकाच्या ऑक्सिजन उत्पादक कंपनीला ४२ तासांत वीजभारात वाढ करून कोरोना लढ्यात मोलाची भूमिका बजाविण्यात आली. त्यामुळे महावितरण भांडुप परिमंडळचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी डोलवी येथील ऑक्सिजन उत्पादक जे. एस. डब्ल्यू. प्रकल्पाला भेट दिली. त्यांनी जे. एस.डब्ल्यूला वीजपुरवठा करणाऱ्या विद्युत यंत्रणेचा आढावा घेत प्रकल्पाला अखंडित वीजपुरवठा करण्याचे निर्देश दिले.
कोरोनाच्या गंभीर रुग्णांसाठी ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. मात्र, आरोग्य यंत्रणेस ऑक्सिजनची कमतरता भासू लागली आहे. या पार्श्वभूमीवर जे. एस. डब्ल्यू. या ऑक्सिजन उत्पादक कंपनीने प्रकल्प क्षमता वाढविण्यासाठी महावितरणकडून वाढीव वीजभार मंजूर होणेबाबत चर्चा केली होती. याची दाखल घेऊन संबंधित ग्राहकांशी थेट संपर्क साधून वीजभार वाढीसाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता एका दिवसात पूर्ण करून या कंपनीचे वाढीव वीजभार यशस्वीपणे कार्यान्वित करण्यात आले आहे.
..................................