Join us  

अंबानींच्या लग्नात बिनबुलाया मेहमान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2024 5:52 AM

सुरक्षारक्षकांनी त्याला पकडून बीकेसी पोलिसांच्या ताब्यात दिले.

मुंबई : जगभरात चर्चा असलेल्या उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाह सोहळ्यात एक बिनबुलाया मेहमान शिरला. मात्र सुरक्षारक्षकांनी त्याला पकडून बीकेसी पोलिसांच्या ताब्यात दिले.

सुरक्षारक्षक बलरामसिंग लाल यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. अंबानींच्या विवाह सोहळ्याकरिता पास असलेल्या व्यक्तींनाच प्रवेश दिला जात होता. बलरामसिंग शुक्रवारी मध्यरात्रीनंतर २:५० च्या सुमारास सहकाऱ्यांसह जिओ वर्ल्डमध्ये तपासणी करत असताना त्यांना एक व्यक्ती संशयास्पदरीत्या फिरताना तेथे आढळली. त्यांनी चौकशी करताच त्याने त्याचे नाव लुकमान मोहम्मद शफी शेख (२८, रा. विरार) असल्याचे सांगितले. त्याने जिओ वर्ल्ड सेंटरच्या गेट क्रमांक १० मधून विनापरवाना प्रवेश केल्याचेही कबूल केले. त्यामुळे त्याला सुरक्षारक्षकांनी गेटमधून बाहेर जाण्यास सांगितले. मात्र, तो बाहेर न जाता तिथेच थांबला. अखेर सुरक्षा यंत्रणेने  त्याला घेऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. तो कशासाठी तेथे आला होता, याचा तपास सुरू आहे.

टॅग्स :मुंबईमुकेश अंबानी