आंतरराष्ट्रीय योग दिनात केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयलही सहभागी, उत्तर मुंबईतील नागरिकांनी केला योगाभ्यास 

By मनोहर कुंभेजकर | Published: June 21, 2024 05:30 PM2024-06-21T17:30:27+5:302024-06-21T17:31:04+5:30

पोयसर जिमखाना कांदिवली पश्चिम येथे आयोजित योग कार्यक्रमात माजी खासदार गोपाळ शेट्टी व संस्थेचे अध्यक्ष मुकेश भंडारी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Union Commerce Minister Piyush Goyal also participated in International Yoga Day, citizens of North Mumbai practiced yoga  | आंतरराष्ट्रीय योग दिनात केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयलही सहभागी, उत्तर मुंबईतील नागरिकांनी केला योगाभ्यास 

आंतरराष्ट्रीय योग दिनात केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयलही सहभागी, उत्तर मुंबईतील नागरिकांनी केला योगाभ्यास 

मुंबई :केंद्रीय वाणिज्य मंत्री आणि उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार पीयूष गोयल यांनी स्वतः आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज सकाळी उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील कांदिवली पश्चिम,चारकोप तसेच पोयसर जिमखाना,बोरिवली कोरकेंद्र डोम,दहिसर येथील गोपीनाथ मुंडे शक्ती मैदान या ठिकाणी आयोजित आंतरराष्ट्रीय योग दिनात सहभागी होवून त्यांनी योगाभ्यास केला.तर उत्तर मुंबईतील नागरिक देखिल मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

पोयसर जिमखाना कांदिवली पश्चिम येथे आयोजित योग कार्यक्रमात माजी खासदार गोपाळ शेट्टी व संस्थेचे अध्यक्ष मुकेश भंडारी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

भारतीय जनता पक्ष उत्तर मुंबई आणि चारकोप कल्चरल अँड स्पोर्ट्स फाउंडेशनच्या पुढाकाराने आयोजित कार्यक्रमात त्यांनी योगासन केली.तर बोरिवली कोरकेंद्र डोम येथे आमदार सुनील राणे, दहिसर गोपीनाथ मुंडे शक्ती मैदान येथे आमदार मनीषा चौधरी यांनी आयोजित योगाभ्यास कार्यक्रमात केंद्रीय मंत्री पियुष गोयल उपस्थित राहून त्यांनी योगाभ्यास केले.

यावेळी  पीयूष गोयल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे दि,२१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनाची मान्यता मिळाल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता आणि आनंद व्यक्त केला.

योगाच्या सरावाने आरोग्य आणि मानसिक शांती मजबूत करण्यासाठी उपस्थित तरुण, किशोरवयीन आणि विद्यार्थ्यांनी मानसिक शांती आणि शारीरिक बळकटीसाठी योगाभ्यासाचा जीवनशैलीत समावेश करण्याचे त्यांनी आवाहन केले.
 

Web Title: Union Commerce Minister Piyush Goyal also participated in International Yoga Day, citizens of North Mumbai practiced yoga 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.