"देवेंद्र फडणवीसांच्या यॉर्करवर राष्ट्रवादीचा त्रिफळा", नारायण राणेंचे एका दगडात तीन पक्षी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2023 03:39 PM2023-07-02T15:39:43+5:302023-07-02T15:40:18+5:30

महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप करत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

Union Minister Narayan Rane criticizes Sharad Pawar, Sanjay Raut and Uddhav Thackeray after Ajit Pawar takes oath as Deputy Chief Minister of Maharashtra  | "देवेंद्र फडणवीसांच्या यॉर्करवर राष्ट्रवादीचा त्रिफळा", नारायण राणेंचे एका दगडात तीन पक्षी

"देवेंद्र फडणवीसांच्या यॉर्करवर राष्ट्रवादीचा त्रिफळा", नारायण राणेंचे एका दगडात तीन पक्षी

googlenewsNext

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप करत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवारांसह छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रिफ, धनंजय मुंडे, धर्मरावबाबा आत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे आणि अनिल पाटील यांची मंत्रिपदी वर्णी लागली आहे. शरद पवारांच्या पक्षाचे जवळपास ४० आमदार अजित पवारांनी फोडले असून राष्ट्रवादीत उभी फूट पाडली आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असून त्यांच्यासोबत ९ आमदार मंत्री झाले आहेत. 

दरम्यान, राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राष्ट्रवादीसह शरद पवारांना लक्ष्य केले. "शरद पवारांच्या गुगलीवर सिक्सर... देवेंद्र फडणवीस यांच्या यॉर्करवर राष्ट्रवादीचा त्रिफळा उडाला. उद्धव ठाकरे हिट विकेट आणि संजय राऊत स्वत: पायात अडकून पडून रन आऊट फडणवीस यांचे अभिनंदन", अशा शब्दांत राणेंनी सध्याच्या राजकीय घडामोडींवरून शरद पवार, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. 

दरम्यान, अजित पवारांच्या शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांसह देवेंद्र फडणवीस यांची देखील उपस्थिती होती. याशिवाय भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे देखील उपस्थित होते. 


 

कोणता राजकीय पक्ष येत्या काळात महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पुढे घेऊन जाऊ शकतो, असं तुम्हाला वाटतं?

VOTEBack to voteView Results

Web Title: Union Minister Narayan Rane criticizes Sharad Pawar, Sanjay Raut and Uddhav Thackeray after Ajit Pawar takes oath as Deputy Chief Minister of Maharashtra 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.