खून होताहेत, दरोडे पडताहेत; राज्यात राष्ट्रपती राजवट गरजेची, नारायण राणेंचं मोठं विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2022 04:23 PM2022-04-24T16:23:36+5:302022-04-24T16:25:06+5:30
राज्याची व्यवस्था पूर्णपणे बिघडली असल्याची टीका नारायण राणे यांनी केली आहे.
मुंबई: सामाजिक तेढ निर्माण करणारं विधान केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या राणा दाम्पत्याला वांद्रे न्यायालयानं कोठडी सुनावली आहे. राणा दाम्पत्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. सुट्टीकालीन न्यायालयानं हा निकाल दिला. या प्रकरणातील पुढील सुनावणी २९ एप्रिलला होईल. त्याआधी उच्च न्यायालयात दाद मागण्याचा पर्याय राणा दाम्पत्याकडे उपलब्ध आहे.
राणा दाम्पत्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर त्यांनी लगेचच जामीनासाठी अर्ज केला. मात्र या प्रकरणाची सुनावणी न्यायालयानं २९ एप्रिलला ठेवली आहे. त्यामुळे राणा दाम्पत्याचा कोठडीतील मुक्काम वाढला आहे. आता रवी राणांची रवानगी आर्थर रोड तुरुंगात, तर नवनीत राणांची रवानगी भायखळा तुरुंगात केली जाईल.
राणा दाम्पत्यावर केलेल्या कारवाईवर केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे नेते नारायण राणे यांनी टीका केली आहे. देशात लोकशाही आहे. कोणी हनुमान चालिसा पठण करण्यासाठी येत असेल, तर विरोध का, असा सवाल नारायण राणे यांनी उपस्थित केला आहे.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सक्षम नाही. राज्याचे प्रश्न त्यांना माहिती नाही. ८९ हजार कोटींचा तूट आहे. राज्याची व्यवस्था पूर्णपणे बिघडली असल्याची टीका नारायण राणे यांनी केली आहे. तसेच एका व्यक्तीला एक कायदा आणि दुसऱ्याला दुसरा कायदा, असा प्रकार राज्यात सुरु आहे. उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राला मागे नेल्याची टीका देखील नारायण राणे यांनी केली आहे.
'तुम्ही घुसून हनुमान चालिसा वाचणार, मग आता आम्हीही घुसू'; संजय राऊतांनी दिला इशारा https://t.co/JiqSgmrHQW
— Lokmat (@lokmat) April 24, 2022
पोलीस आणि शिवसैनिक एकत्र येऊन सूड उगवण्याचे काम करत आहेत. कायदा आणि सुव्यवस्था नाही. खून होत आहेत. दरोडे पडताय, शेतकऱ्यांचे प्रश्न सुटलेले नाही, अशा परिस्थितीत राष्ट्रपती राजवट येणे गरजेचं आहे, असं मत नारायण राणे यांनी व्यक्त केलं आहे.