Join us

वर्सोवाकरांच्या स्वागताने भारावले केंद्रीय मंत्री पियुष गोयल

By मनोहर कुंभेजकर | Published: April 30, 2023 8:45 PM

यावेळी मुंबई भाजपा अध्यक्ष,आमदार अँड आशिष शेलार उपस्थित होते.

मुंबई-वर्सोवा कोळीवाड्यात आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करण्याची वर्सोवाकरांची परंपरा आहे.आज वर्सोवा कोळीवाड्यामध्ये केंद्रीय  ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण, वस्त्रोद्योग,वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी हिंगळादेवीचे दर्शन घेतले.  मुंबईमध्ये लोकसभा प्रवास करत असताना आज त्यांनी वर्सोवा कोळीवाड्याला भेट दिली. वर्सोव्याच्या स्थानिक आमदार डॉ. भारती लव्हेकर यांनी त्यांचे शाल श्रीफळ तुळस व खास कोळी बांधवांची टोपी घालून स्वागत केले.यावेळी मुंबई भाजपा अध्यक्ष,आमदार अँड आशिष शेलार उपस्थित होते.

येथील वर्सोवा बस स्टॉप समोरील मसान देवी मंदिरापासून वर्सोवाकरांची ग्रामदैवत असलेल्या पुरातन हिंगळा देवीच्या मंदिरापर्यंत कोळी नृत्य करत आणि बँड वाजवत कोळी बांधवांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. यावेळी मोठ्या प्रमाणावर कोळी बांधव उपस्थित होते.वर्सोवाकरांच्या स्वागताने आणि आगत्याने तर केंद्रीय मंत्री पियुष गोयल भारावून गेले.

येथील हिंगळादेवी मंदिरामध्ये त्यांच्या हस्ते आरती करण्यात आली व तिथून परत मिरवणूक काढत मसान देवीच्या मंदिरात येऊन येथील वकोळी बांधवांसोबत त्यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोळी बांधवांनी आपल्या प्रश्नांची निवेदने त्यांना दिली. त्यांनी मांडलेल्या समस्या संदर्भात केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी मार्गदर्शन केले. 

मुंबई भाजपा अध्यक्ष,आमदार अँड आशिष शेलार यांनीही मसान देवी मंदिरामध्ये येऊन देवीचे दर्शन घेतले व कोळी बांधवांची संवाद साधला. त्यांचे स्वागत आमदार डॉ. भारती लव्हेकर यांनी कोळी बांधवांची टोपी घालून व शाल, श्रीफळ देऊन केला. यावेळी मच्छीमार महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या. यावेळी माजी नगरसेवक योगीराज दाभाडकर, माजी नगरसेविका रंजना पाटील, मुरजी पटेल, मंडल अध्यक्ष पंकज भावे, भाजप पदाधिकारी व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :मुंबईपीयुष गोयल