गणपतीपूर्वी बोरिवलीवरून कोकण रेल्वेची सुविधा सुरू करणार-केंद्रीय मंत्री पियुष गोयल

By मनोहर कुंभेजकर | Published: July 28, 2024 07:21 PM2024-07-28T19:21:19+5:302024-07-28T19:21:40+5:30

पियुष गोयल यांनी आज बोरीवलीत एका पत्रकार परिषदेत दिली.

Union Minister Piyush Goyal will start Konkan Railway facility from Borivali before Ganapati | गणपतीपूर्वी बोरिवलीवरून कोकण रेल्वेची सुविधा सुरू करणार-केंद्रीय मंत्री पियुष गोयल

गणपतीपूर्वी बोरिवलीवरून कोकण रेल्वेची सुविधा सुरू करणार-केंद्रीय मंत्री पियुष गोयल

मुंबई- केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील विविध रेल्वे प्रकल्पांसाठी सुमारे १५९०० कोटींची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.येत्या आठ महिन्यात त्याचा फायदा राज्याला व उत्तर मुंबईला देखिल होणार आहे.गणेशोत्सव निमित्तानं कोकणवासीयांना आपल्या गावी साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाला  पोहोचण्यासाठी बोरिवली येथून वसई मार्गे रिल्वे गाड्या सोडण्यात येईल.तसेच तसेच येत्या  महिन्यात छत्रपती शिवजी महाराज टर्मिनल्स ते गोरेगाव पर्यंत असणाऱ्या हार्बर रेल्वेचा विस्तार बोरिवली पर्यंत करण्यात येईल अशी माहिती केंद्रीय वाणिज्य मंत्री व उत्तर मुंबईचे खासदार पियुष गोयल यांनी आज बोरीवलीत एका पत्रकार परिषदेत दिली.

छ्त्रपती शिवाजी महाराज टर्मिनल  आणि वांद्रे येथून मात्र कोकणासाठी रेल्वे गाड्या सोडण्यात येतात. मात्र बोरिवली येथून एक ही गाड्या कोकणात जात नसल्याने उत्तर मुंबईच्या नागरिकांना छ्त्रपती शिवाजी महाराज टर्मिनलला पोहोचण्यासाठी उत्तर मुंबईच्या नागरिकांना खूप अडचणी येत होत्या. गणेशोत्सव निमित्तानं कोकणवासीयांना आपल्या गावी साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाला पोहोचण्यासाठी बोरिवली येथून वसई मार्गे रिल्वे गाड्या सोडण्यात येईल.यामुळे कोकणवासीयांना आणि कोकणात व गोव्याला जाणाऱ्या इतर प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. या संदर्भात केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत लवकरच होणाऱ्या कार्यक्रमत विधिवत शुभारंभ करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली.

आज बोरिवली पश्चिम एक्सर येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत त्यांनी आगामी काळात उत्तर मुंबईला उत्तम मुंबई कसे करणार यावर त्यांनी विविध विषयांवर सविस्तर भाष्य केले. उत्तर मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान व गोराई-मनोरी, मढ,मार्वे आदी समुद्र किनारे लाभले आहेत. त्यामुळे त्यांचा
पर्यंटन केंद्र म्हणून कसा विकास करता येईल आणि या समुद्र किनाऱ्यांवर वॉटर स्पोर्ट्स,खाऱ्या पाण्याचे गोड पाणी करणे आदी प्रकल्प करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.गोराई गावात आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आणि मागाठाणे मेट्रो स्टेशन जवळ भविष्यात १००० बेडचे हॉस्पिटल सुरू करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.

मुंबईत अनेक नवीन प्रकल्प येत आहेत, मेट्रोचे जाळे पसरले जाणार आहे,रस्त्यांची सिमेंटीकरणाची कामे पूर्ण झाल्यावर उत्तर मुंबईतील वाहतूक कोंडी निश्चित कमी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. उत्तर मुंबई झोपडपट्टीमुक्त करण्याचा मनोदय व्यक्त करतांना यातील अडचणी सोडवण्यासाठी एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या बरोबर आपण बोललो असून लवकरच सदर बैठक आयोजित करण्यात येईल.मात्र झोपडपट्टीत राहणाऱ्या काही मोजक्या नागरिकांच्या विरोधामुळे या योजनेला खिळ बसते असे गोयल यांनी स्पष्ट केले.संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील झोपडपट्टीवासीयांना घरे देण्यासाठी लवकरच दिल्लीत केंद्रीय मंत्री भुपेंद्र यादव यांच्या बरोबर संबंधितांची बैठक आयोजित केली जाणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी दिली.

Web Title: Union Minister Piyush Goyal will start Konkan Railway facility from Borivali before Ganapati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.