Maharashtra Budget 2023: “महाराष्ट्राला आर्थिक, सामाजिक, औद्योगिक नवसंजीवनी देणारा अर्थसंकल्प”: रामदास आठवले 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2023 08:15 PM2023-03-09T20:15:16+5:302023-03-09T20:16:42+5:30

Maharashtra Budget 2023: देवेंद्र फडणवीसांच्या अर्थशस्त्राचा अभ्यास आणि दूरदृष्टीचे चमक दाखविणारा यंदाचा अर्थसंकल्प आहे, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

union minister ramdas athawale reaction on shinde fadnavis govt maharashtra budget 2023 | Maharashtra Budget 2023: “महाराष्ट्राला आर्थिक, सामाजिक, औद्योगिक नवसंजीवनी देणारा अर्थसंकल्प”: रामदास आठवले 

Maharashtra Budget 2023: “महाराष्ट्राला आर्थिक, सामाजिक, औद्योगिक नवसंजीवनी देणारा अर्थसंकल्प”: रामदास आठवले 

googlenewsNext

Maharashtra Budget 2023: महाराष्ट्राला आर्थिक, सामाजिक औद्योगिक आणि कृषी क्षेत्राला नवसंजीवनी देणारा अर्थसंकल्प राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केला असून, या अर्थसंकल्पाचे आम्ही स्वागत करीत असल्याची प्रतिक्रिया रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी व्यक्त केली आहे. 

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकार कडून जनतेला असलेल्या अपेक्षेप्रमाणे सुखद आणि समाधानकारक अर्थसंकल्प अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केला आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी दृढसंकल्प करणाऱ्या या अर्थसंकल्पात देवेंद्र फडणवीस यांच्या अर्थशस्त्राचा अभ्यास आणि दूरदृष्टीचे चमक दाखविणारा यंदाचा अर्थसंकल्प आहे, असे रामदास आठवले यांनी सांगितले. 

महाराष्ट्राच्या विकासाला चालना देणारा यंदाचा अर्थसंकल्प

महिलांना सक्षम करणारा, उद्योग आणि कृषी क्षेत्राला उभारी देणारा, सामाजिक न्यायाला प्राधान्य देणारा, महाराष्ट्राच्या विकासाला चालना देणारा यंदाचा अर्थसंकल्प आहे. शेतकरी, कामगार तसेच दलित आदिवासी ओबीसी आणि महिला यांसह समाजातील सर्व घटकांना सक्षम करणारा, समान न्याय देणारा आणि स्वातंत्र्याच्या अमृतकाळात सर्व समाज घटकांना समतेची नवसंजीवनी देणारा अर्थसंकल्प महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केला आहे, असे मत रामदास आठवले यांनी व्यक्त केले.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: union minister ramdas athawale reaction on shinde fadnavis govt maharashtra budget 2023

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.