जपानी मराठी आमदार अन् आई हॉटेल मालकीण, पुराणिक माय-लेकाचा अनोखा प्रवास

By यदू जोशी | Published: January 7, 2023 06:07 AM2023-01-07T06:07:15+5:302023-01-07T06:07:36+5:30

योगी यांच्या आई रेखा शरद पुराणिक या वयाच्या ५७ व्या वर्षी मुलाकडे जपानला गेल्या. जपानी भाषा शिकल्या.

Unique journey of Japanese Marathi MLA Yogendra Puranik and mother hotel owner, Puranik My-Leka | जपानी मराठी आमदार अन् आई हॉटेल मालकीण, पुराणिक माय-लेकाचा अनोखा प्रवास

जपानी मराठी आमदार अन् आई हॉटेल मालकीण, पुराणिक माय-लेकाचा अनोखा प्रवास

googlenewsNext

मुंबई : योगेंद्र पुराणिक तथा योगी हा केवळ ४५ वर्षांचा मराठी माणूस. जपानमध्ये पोलारिस सॉफ्टवेअर कंपनीचे अध्यक्ष (जपान ऑपरेशन), मिझाहो बँकेचे वरिष्ठ अधिकारी, राकुतेन बँकेचे संचालक ते थेट लेजिस्लेटिव्ह असेंब्लीचे सदस्य (आमदार) आणि आता सोळाशे विद्यार्थी असलेल्या शाळेचे  प्राचार्य असा त्यांचा विलक्षण  प्रवास आहे.

योगी यांच्या आई रेखा शरद पुराणिक या वयाच्या ५७ व्या वर्षी मुलाकडे जपानला गेल्या. जपानी भाषा शिकल्या. आज त्या ६७ वर्षांच्या आहेत आणि टोकियोत त्यांची दोन रेस्टॉरन्ट आहेत, ‘इंडियन होम फूड रेखा’ या नावाने. त्यांच्या एका रेस्टॉरन्टमध्ये फक्त मराठी खाद्यपदार्थ मिळतात. विश्व मराठी संमेलनाच्या निमित्ताने हे मायलेक मुंबईत आले होते. अंबरनाथमध्ये १५ वर्षे असंख्य मुलींना मोफत शिवणकाम शिकवून व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत करणाऱ्या रेखा सातवी पास अन् शिवणकामाचा डिप्लोमा केलेल्या. आता त्यांना त्यांच्या रेस्टॉरन्ट विश्वाचा आणखी विस्तार टोकियोमध्ये करायचा आहे. 

असा झाला प्रवास... 
     योगी हे १९९७ मध्ये शिष्यवृत्ती मिळाल्याने जपानला गेले आणि तिथलेच झाले. सामाजिक कार्य त्यांनी उभे केले. 
     एदोगावा प्रांताच्या गव्हर्नर पदाची निवडणूक लढण्याची तयारी ते करीत आहेत. ते इबाराकी प्रांतातील त्सुचिऊरा फर्स्ट हायस्कूलचे प्राचार्य आहेत. 
     जपानमधील अनेक चांगल्या गोष्टी महाराष्ट्रात आणता येतील असे त्यांना वाटते. या संदर्भात त्यांनी बुधवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली.

Web Title: Unique journey of Japanese Marathi MLA Yogendra Puranik and mother hotel owner, Puranik My-Leka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.