Join us

सेन्सॉर अध्यक्षांविरोधात बॉलीवूडमध्ये एकजूट

By admin | Published: March 17, 2015 1:41 AM

लीला सॅमसन यांनी सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर मोदी सरकारने त्यांच्या जागी ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते पहलाज निहलानी यांना अध्यक्षपद दिले.

मुंबई : लीला सॅमसन यांनी सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर मोदी सरकारने त्यांच्या जागी ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते पहलाज निहलानी यांना अध्यक्षपद दिले. पण दोनच महिन्यात त्यांच्या कामाबाबत व संस्कृतीरक्षणाच्या पवित्र्यावर असंतोष व्यक्त करीत त्यांना हटवण्याच्या मागणीवर बॉलीवूडमध्ये एकजूट झाली आहे. सोमवारी केंद्रीय सूचना प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड यांच्यासमवेत बॉलीवूडच्या काही निर्माता-दिग्दर्शक-कलाकारानी एकत्र येत मुंबईत बैठक घेतली. त्यावेळी या मागणीचा जोरदार आग्रह झाला. निहलानींना हटविण्याची मागणी करणाऱ्यांमध्ये सेन्सॉर बोर्डाचे सदस्य असलेल्या डॉ.चंद्रप्रकाश द्विवेदींचे नाव आघाडीवर आहे. द्विवेदी हे निहलांनीच्या कारभाराबाबत असमाधानी (असल्याचे सांगितले जाते. तसेच गेल्या शुक्रवारी अनुष्का शर्माचा ह्यएनएच १०’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. पण, सेन्सॉर बोर्डाने वेळेत संमती न दिल्याने हा चित्रपट ६ मार्चऐवजी १३ मार्चला प्रदर्शित करण्यात आला. मात्र बोर्डाच्या सदस्यांच्या मर्जीविरूद्ध अतिशय वाईट पद्धतीने चित्रपटातील काही महत्वाची दृष्ये कापण्यात आली. त्यामुळे नाराज झालेली अनुष्का शर्माही मंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित होती. याविषयी राठोड म्हणाले की, चित्रपटसृष्टीकडून अनेक सूचना आल्या असून त्याकडे लक्ष दिले जाईल. मात्र पहलाज निहलानींना हटवण्यासंदर्भात काय झाले हे सांगण्यास त्यांनी नकार दिला. या बैठकीत सहभागी झालेल्या आमीर खानने टिष्ट्वट करून हे सेन्सॉर नव्हे, तर केवळ सर्टिफिकेशन बॉर्ड आहे. तसेच इथे सरळ मार्गानेच कामे झाली पाहिजेत असे मत व्यक्त केले आहे. पहलाज निहलानींनी काही दिवसांपूर्वी अश्लील शब्दावलीची एक यादी तयार करत चित्रपटात त्या शब्दांवर बंदी आणली होती. त्यामुळे खूप वाद झाल्याने ती बंदी मागे घ्यावी लागली होती. आता बॉलीवूडच त्यांना हटवण्यासाठी पावले उचलत आहे. बॉलीवूडचे दिग्गज एकत्रसूचना प्रसारण राज्यमंत्री राठोड यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत बॉलिवूडमधील अनेक दिग्गज एकत्र आले. यात आमीर खान- किरण राव यांच्यासवेत मुकेश भट्ट, रमेश सिप्पी, गुलजार, विशाल भारद्वाज, अनुराग कश्यप, करण जोहर, राजकुमार हिरानी, विद्या बालन, सिद्धार्थ रॉय-कपूर, रितेश देशमुख, अनुष्का शर्मा, पीयूष मिश्रा यांचा समावेश होता.