विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी विद्यापीठांनी परीक्षांचे निकाल वेळेत जाहीर करा; राज्यपाल यांचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2024 03:09 PM2024-02-03T15:09:15+5:302024-02-03T15:10:02+5:30

राजभवन येथे राज्यपाल बैस यांच्या अध्यक्षतेखाली कुलगुरू संयुक्त मंडळाची बैठक संपन्न झाली. 

Universities declare exam results on time for the future of students; Governor's instructions | विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी विद्यापीठांनी परीक्षांचे निकाल वेळेत जाहीर करा; राज्यपाल यांचे निर्देश

विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी विद्यापीठांनी परीक्षांचे निकाल वेळेत जाहीर करा; राज्यपाल यांचे निर्देश

मुंबई:  विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, नोकरीच्या संधीमध्ये अडचणी येऊ नयेत. विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचारू करून सर्व विद्यापीठांनी वेळेत अभ्यासक्रम पूर्ण करून परीक्षांचे निकाल वेळेत जाहीर करावेत, असे निर्देश राज्यपाल रमेश बैस यांनी दिले. राजभवन येथे राज्यपाल बैस यांच्या अध्यक्षतेखाली कुलगुरू संयुक्त मंडळाची बैठक संपन्न झाली. 

राज्यपाल म्हणाले की,  महाविद्यालयांनी एकत्रित येऊन  क्लस्टर युनिव्हर्सिटी बनविण्याचा प्रयत्न करावे. शिवाय विद्यापीठांनी ऑलिम्पिक विजेते तयार होण्यासाठी प्रयत्न करावेत. नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी शासन अग्रेसर आहे. प्रत्येक कुलगुरूनी विद्यापीठामध्ये नवीन शैक्षणिक धोरण अंमलबजावणी आणि केलेल्या कार्यवाहीबाबत सविस्तर अहवाल पाठवावा. जर्मनी, जपान, इस्राईल यासारख्या देशांनी भारताकडून कुशल मनुष्यबळाची अपेक्षा केली आहे.  

महाराष्ट्राकडून कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देणे आणि व्यवसायाभिमुख शिक्षणावर अधिक भर देऊन रोजगार निर्मितीकडे लक्ष द्यावे. उच्च शिक्षणामध्ये महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर राहिलेला आहे. NIRF रैंकिंगमध्ये सुद्धा महाराष्ट्रातील विविध महाविद्यालये, विद्यापीठाचा समावेश वाढवा. यासाठी प्रयत्न करावे, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त केली. आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा ३५० वा वर्धापन दिन साजरा करत आहोत. यानिमित्त पारंपरिक खेळांना प्रोत्साहन द्यावे. महाविद्यालय हे समाज परिवर्तनाचे माध्यम आहे. प्रत्येक कुलगुरूनी ग्रामीण भागातील दहा गावे दत्तक घेऊन  त्यांचा सामजिक विकास कसा होईल याकडे विशेष लक्ष द्यावे. महाविद्यालय परिसर हा नशामुक्त ठेवण्याचे आवाहनही राज्यपाल यांनी यावेळी केले.

Web Title: Universities declare exam results on time for the future of students; Governor's instructions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.