सोशल मीडियावर विद्यार्थ्यांप्रमाणे विद्यापीठही अ‍ॅक्टिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2019 01:55 AM2019-12-30T01:55:14+5:302019-12-30T01:55:32+5:30

- सीमा महांगडे  मुंबई : सोशल मीडिया आणि तरुणाई यांची जवळीक वेगळी सांगायला नको..! आजची तरुणाई आणि युवावर्ग हा प्रत्येक ...

The university is as active as the students on social media | सोशल मीडियावर विद्यार्थ्यांप्रमाणे विद्यापीठही अ‍ॅक्टिव्ह

सोशल मीडियावर विद्यार्थ्यांप्रमाणे विद्यापीठही अ‍ॅक्टिव्ह

googlenewsNext

- सीमा महांगडे 

मुंबई : सोशल मीडिया आणि तरुणाई यांची जवळीक वेगळी सांगायला नको..! आजची तरुणाई आणि युवावर्ग हा प्रत्येक प्रकारच्या सोशल मीडियावर सक्रिय असतो आणि सतत त्याचा वापर करून स्वत:ला विविध विषयांच्या बाबतीत अपडेट ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. आता ही सोशल मीडियाची एकूण यंत्रणा काळानुरूप बदलत आहे, तसा त्याचा वापर, व्याप्तीही बदलत आहे. मुळात तरुणाई म्हणजेच विद्यार्थी वापर करत असलेल्या सोशल मीडिया यंत्रणेचा ते भाग असलेल्या शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठ किती व कसा वापर करते, हे पाहणेही महत्त्वाचा भाग आहे. तरुणाईचा मोठा वर्ग हा मुंबई विद्यापीठाचा विद्यार्थी असून, मुंबई विद्यापीठाच्या यंत्रणेत सोशल मीडियाचा वापर कसा होतो आणि विद्यार्थ्यांच्या समस्या यंत्रणेपर्यंत कशा पोहोचतात? त्यासाठी सोशल मीडियाचा वापर कितपत होतो, याचा अभ्यास होणे आवश्यक आहे.

देशासह राज्यातील अग्रगण्य विद्यापीठ म्हणून मुंबई विद्यापीठाची ओळख आहे. काळानुरूप होणाऱ्या बदलांना अनुसरून विद्यापीठाने अधिकाअधिक विद्यार्थ्यांसह समाजातील भागधारकांना विद्यापीठाची ध्येय धोरणे, महत्त्वाचे उपक्रम व माहिती पोहोचविणे विद्यार्थी आणि समाज यांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. याचाच विचार करून मुंबई विद्यापीठाने सोशल मीडियाच्या यंत्रणेचा प्रभावी वापर करून घेण्याचे ठरविले आणि विद्यापीठाने २०१५ला टिष्ट्वटर हँडल सुरू केले आहे. विशेष बाब म्हणजे, विद्यापीठाच्या या हँडलवर सुमारे साडेबारा हजारांहून अधिक फॉलोअर आहेत. विद्यापीठाच्या महत्त्वाच्या उपक्रमांची माहिती ही विद्यापीठाच्या टिष्ट्वटर हँडलवरून दिली जाते. या प्लॅटफॉर्मवर विद्यार्थी त्यांच्या शंकाही उपस्थित करतात. अनेक विद्यार्थी याच हँडलवर आपल्याला येत असलेल्या समस्याही मांडतात. त्यामुळे यावरून अनेक शंकांचे निरसनही केले जाते. विद्यार्थ्यांच्या काही शैक्षणिक समस्याही सोडविण्याचा या माध्यमातून पुरेपूर प्रयत्न केला जातो.

विद्यापीठाचे अद्ययावत संकेतस्थळ
भविष्यकालीन योजनांमध्ये विद्यापीठाने नुकतेच आपले अद्ययावत संकेतस्थळ सुरू केले असून, या संकेतस्थळावर टिष्ट्वटर, फेसबुक, लिंकइन अशा समाजमाध्यमांचे यूआरएल दिले आहेत. फेसबुकवर विद्यापीठाच्या विविध भागांची, तसेच आयडॉलसाठी असणाºया स्वतंत्र फेसबुक पेजवर तेथील सूचनांची माहिती विद्यार्थ्यांना वेळोवेळी मिळत असते. विद्यार्थ्यांना विशेषत: आयडॉलच्या विद्यार्थ्यांना परीक्षांच्या वेळापत्रकाची माहिती मिळण्यास या फेसबुक पेजेसची मदत होते. टिष्ट्वटर हँडलवरील बातम्यांमुळे अनेकदा विद्यापीठातील नवीन घडामोडी, बदललेले वेळापत्रक, अ‍ॅप्लिकेशन्स यांचीही माहिती मिळत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर काळानुरूप होणाºया बदलांना अनुसरून विद्यापीठामार्फत या समाजमाध्यमांवर अधिक प्रभावीपणे माहितीचे देवाण-घेवाण करण्याची बाब विद्यापीठाच्या विचाराधीन असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आली आहे. कालपरत्वे होणाºया बदलांना अनुसरून विद्यापीठामार्फत या समाजमाध्यमांवर अधिक प्रभावीपणे माहितीची देवाण-घेवाण करण्याची बाब विद्यापीठाच्या विचाराधीन आहे.

विद्यार्थ्यांचाही चांगला प्रतिसाद
मुंबई विद्यापीठाकडून राबविण्यात येणाºया सोशल मीडिया यंत्रणेला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेक विभागांतील आणि उपकेंद्रावरील विद्यार्थी अनेकदा स्वत: विद्यापीठापर्यंत पोहोचू शकत नसल्याने, या माध्यमांचा विद्यार्थ्यांना उपयोग करून घेता येत आहे. सोशल मीडिया यंत्रणेसाठी सध्या विद्यापीठ प्रशासनच लक्ष देत आहे. स्वत: जनसंपर्क अधिकारी याचा वेळोवेळी आढावा घेत असून, यासंबंधीची माहिती कुलगुरू आणि प्रकुलगुरू यांना देत असतात. विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या समस्यांची आणि आवश्यकतांची व्याप्ती अधिक समजून घेण्यासाठी यंत्रणेसाठी असणाºया टीमची व्याप्तीही वाढविणे आवश्यक असल्याचे मत काही विद्यार्थी व्यक्त करत आहेत.

Web Title: The university is as active as the students on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.