विद्यापीठाकडून दिवसभरात फक्त ९ निकाल जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2017 06:58 AM2017-08-09T06:58:36+5:302017-08-09T06:58:36+5:30

मुंबई विद्यापीठाने मंगळवारी फक्त ९ निकाल जाहीर केले आहेत. अजूनही तब्बल १८८ निकाल विद्यापीठाला पुढच्या सात दिवसांत जाहीर करायचे आहेत.

 University announces only 9 results throughout the day | विद्यापीठाकडून दिवसभरात फक्त ९ निकाल जाहीर

विद्यापीठाकडून दिवसभरात फक्त ९ निकाल जाहीर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई विद्यापीठाने मंगळवारी फक्त ९ निकाल जाहीर केले आहेत. अजूनही तब्बल १८८ निकाल विद्यापीठाला पुढच्या सात दिवसांत जाहीर करायचे आहेत. मुंबई विद्यापीठाने राज्यपालांनी दिलेल्या निकालाच्या दोन डेडलाईन चुकवल्या आहेत. तरीही अजूनही विद्यापीठांच्या निकालाच्या कामाला वेग आलेले नाही.
गेल्या आठवड्यापासून सातत्याने विद्यापीठ दिवसाला ९ ते १२ निकाल जाहीर करत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कामाचा वेग मंदावला आहे का? असे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मंगळवारी उत्तरपत्रिका तपासणीसाठी एकूण १ हजार ८२ प्राध्यापक उपस्थित होते. दिवसभरात या प्राध्यपकांनी १९ हजार ३४७ उत्तरपत्रिकांची तपासणी केली आहे. मुंबई विद्यापीठाच्या हातात सात दिवस उरले असूनही उत्तरपत्रिकांचा डोंगर अजूनही कमी झालेला नाही. हा डोंगर कमी करण्यासाठी मुंबई विद्यापीठ अजूनही तपासणीत सुधारणा करीत असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.
बृहत आराखड्यास मंजुरी
मुंबई विद्यापीठाच्या बृहत आराखाड्याला मंगळवारी अ‍ॅकडमिक कौन्सिलने मंजूरी दिली आहे. आता अंतिम मंजुरीसाठी हा आराखडा सिनेटमध्ये ठेवण्यात येणार आहे.
बुक्टोची सह्यांची मोहीम
मुंबई विद्यापीठात सुरु असलेल्या भोंगळ कारभाराविरुद्ध मंगळवारी बुक्टो या प्राध्यपकांच्या संघटनेर्फे सह्यांची मोहीम राबविण्यात आली. या सह्यांच्या मोहिमेला युवा सेनेसह विद्यार्थी-पालकांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला.

कर्मचाºयांनी दिली मुंबई विद्यापीठाला डेडलाइन
च्गेल्या कित्येक वर्षांपासून मुंबई विद्यापीठातील १,५०० कर्मचाºयांच्या मागण्या प्रलंबित आहेत. त्यामुळे या कर्मचाºयांनी विद्यापीठाला मागण्या पूर्ण करण्यासाठी १५ आॅगस्टची डेडलाईन दिली आहे. प्रलंबित मागण्या पूर्ण न झाल्यास १६ आॅगस्टपासून ‘जादा काम’ पूर्णपणे बंद करण्याचा इशारा कामगार संघटनेने दिला आहे.
च्सेवानिवृत्ती वेतन, भविष्य निर्वाह भत्ता, सेवानिवृत्ती लाभ वेळेत द्या, गट विमा योजनेचे नूतनीकरण करा, रखडलेल्या पदोन्नती तातडीने द्या, अस्थायी कर्मचाºयांना विद्यापीठाच्या सेवेत कायमस्वरूपी सामावून घ्या, सहाव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करा, रिक्त पदे भरा, रिक्त पदांवर अर्हताधारक कर्मचाºयांना सामावून घ्या आणि विद्यापीठ अनुदानित पदांवर दर्शवलेल्या सर्व कर्मचाºयांना कायमस्वरूपी विद्यापीठाच्या सेवेत सामावून घ्या या प्रमुख मागण्या आहेत.

६४ हजार विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर
च्मुंबई विद्यापिठाचे आतापर्यंत २९३ निकाल जाहीर झाले आहेत. अजून १८४ निकाल जाहीर व्हायचे बाकी आहेत. मंगळवारी एकूण १२ निकाल जाहीर केले आहे.
च्तसेच असून अजून ४ लाख १३ हजार विद्यार्थी निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. आतापर्यंत फक्त ६४ हजार विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर झाले आहेत.

Web Title:  University announces only 9 results throughout the day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.