लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई विद्यापीठाकडून मे महिन्यात ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आलेल्या उन्हाळी सत्राच्या पारंपरिक विज्ञान शाखेच्या तृतीय वर्ष बीएस्सी सत्र-६ या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेचा निकाल ७४. ४४ टक्के लागला आहे. विज्ञान शाखेच्या तृतीय वर्ष बीएस्सी सत्र- ६ या परीक्षेत एकूण ७ हजार ६०० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेला १० हजार ६४२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १० हजार ६१० एवढे विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ट झाले होते, तर ३२ विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित होते. तसेच या परीक्षेत १८६ विद्यार्थी हे अनुत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेचा निकाल विद्यापीठाचे संकेतस्थळ http://www.mumresults.in/ यावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यात उन्हाळी सत्राचे आजपर्यंत विद्यापीठाने ६३ निकाल जाहीर केले आहेत.
यासोबत आज आठ परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले असून, त्यात विद्यापीठाने बीएस्सीसमवेत बी. (इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग) सत्र ८, बी. (ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग) सत्र ८, बी. (इन्स्ट्रुमेन्टेशन इंजिनिअरिंग) सत्र ८, मास्टर ऑफ म्युझिक (हिंदुस्थानी क्लासिकल व्होकल म्युझिक) भाग २, तृतीय वर्ष बी. म्युझिक (हिंदुस्थानी क्लासिकल इन्स्ट्रुमेंट म्युझिक पर्क्युसन), तृतीय वर्ष बी. म्युझिक (हिंदुस्थानी क्लासिकल व्होकल म्युझिक), तृतीय वर्ष बी. म्युझिक (हिंदुस्थानी क्लासिकल इन्स्ट्रुमेंट म्युझिक नॉन पर्क्युसन) या निकालांचा समावेश आहे.