मुंबई - आयडॉलच्या पहिल्या पेपरला तांत्रिक बिघाडांचा फटका बसला असून, अनेक विद्यार्थी परीक्षा देऊ शकले नाहीत. तांत्रिक बिघाडामुळे आज परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा पुन्हा घेतली जाणार असल्याचे मुंबई विद्यापीठाच्या आयडॉल प्रशासनकडून स्पष्ट करण्यात आपले असले तरी विद्यार्थ्यांनी मात्र यावर प्रचंड नाराजी दर्शविली आहे. परीक्षेची लिंक स्मार्टफोन, संगण्क, लॅपटॉप यांवर परीक्षेचं दिवशी उपलब्ध न झाल्याने चिन्ताग्रस्त विद्यार्थ्यांनी थेट विद्यापिठाच्या कालिना संकुलात धाव घेतली. १०० ते १२० विद्यार्थ्यांनी आयडॉलसमोर गोंधळ घातल्याने काही वेळासाठी पोलीस यंत्रणेला ही प्रशासनाला हाताशी घ्यावे लागले.आजपासून आयडॉल विभागाच्या परीक्षा सुरु झाल्या असून अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेसाठीची लिंकच त्यांच्या लॅपटॉप व स्मार्टफोनवर मिळाली नाही. अनेक विद्यार्थ्यांना लिंक मिळाली मात्र त्यांचे लॉगीनच होऊ न शकल्याने त्यांना वेळेवर परीक्षा देता आली नाही. अनेकांचे पेपरच एक्टीव्हेट होऊ शकले नाहीत अशा नेक तांत्रिक समस्या विद्यार्थ्यांना आल्याने पहिल्याच पेपरचा फज्जा उडाल्याचे चित्र समोर आले. दरम्यान अनेक विद्यार्थ्यांनी कालिना संकुलात जाब विचारण्यासाठी गर्दी केली. या विद्यार्थ्यांकडून आणि जे विद्यार्थी आज तांत्रिक बिघाडांमुळे परीक्षा देऊ शकले नाहीत त्यांच्याकडून नेमक्या काय तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या ते जाणून घेण्यासाठी अफॉर्म भरून घेण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना संयम बाळगण्यास सांगण्यात आला असून नियोजित वेळापत्रकाप्रमाणे पुढील परीक्षा झाल्यानंतर या परीक्षेचे नियोजन कळवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आला आहे.
Mumbai University Exam : अनेकांना पेपरची लिंकच मिळाली नाही, काहींचे लॉगिन होईना ... !
By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2020 4:00 PM