प्राध्यापकांकडून विद्यापीठाने अखेर खुलासा मागवला
By Admin | Published: August 23, 2014 01:42 AM2014-08-23T01:42:46+5:302014-08-23T01:42:46+5:30
मुंबई विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण विभागातील तीन प्राध्यापकांनी विद्याथ्र्याना दावा ठोकल्याप्रकरणाची दखल घेत विद्यापीठाने प्राध्यापकांकडून खुलासा मागविला आहे.
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण विभागातील तीन प्राध्यापकांनी विद्याथ्र्याना दावा ठोकल्याप्रकरणाची दखल घेत विद्यापीठाने प्राध्यापकांकडून खुलासा मागविला आहे. प्राध्यापकांनी दीड कोटीचा दावा ठोकण्याची नोटीस दिल्याने विद्याथ्र्यानी विद्यार्थी तक्रार निवारण समितीकडे दाद मागितली आहे. या प्रकरणी विद्यापीठाने 27 ऑगस्ट रोजी बैठक बोलावली असून, यामध्ये प्राध्यापकांवर कारवाईचा निर्णय होऊ शकतो.
विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण विभागातील विद्याथ्र्यानी प्राध्यापकांकडून योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याची तक्रार विद्यापीठाच्या विद्यार्थी तक्रार निवारण समितीकडे केली होती. समितीने या प्रकरणाची दखल घेत विद्यार्थी, प्राध्यापक, विभागप्रमुख, ग्रंथपाल आदींचे म्हणणो ऐकून घेऊन प्राध्यापकांनी विद्याथ्र्याचे प्रोजेक्ट स्वीकारावेत आणि त्यांचे योग्य मूल्यमापन करावे. तसेच तक्रार केली म्हणून सूडभावनेने वागू नये, अशी शिफारस केली होती. मात्र प्राध्यापकांनी या शिफारशी धुडकावून लावत विद्याथ्र्यानी प्रत्येकी 50 लाख असा दीड कोटीचा दावा ठोकण्याची नोटीस पाठवली आहे.
याबाबतचे वृत्त सर्वप्रथम ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. या वृत्तानंतर नोटीस पाठविलेल्या विद्याथ्र्यानी विद्यापीठाच्या तक्रार निवारण समितीकडे दाद मागितली आहे.
विद्याथ्र्याच्या तक्रारीची दखल घेत समितीने दावा ठोकणा:या प्राध्यापकांना खुलासा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच या प्रकरणी 27 ऑगस्ट रोजी विद्यापीठात बैठक आयोजित करण्यात आली आहे. प्राध्यापकांना यापूर्वीच समितीने आपली जबाबदारी योग्य रितीने पार पाडण्याची शिफारस केली होती. मात्र, तरीही प्राध्यापकांच्या वागणुकीत बदल झाला नसल्याने समिती प्राध्यापकांवर कठोर कारवाई करण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)