मुंबई - मुंबई विद्यापीठाने आज २०१८ च्या प्रथम सत्र उन्हाळी परीक्षेच्या विधी शाखेच्या (५ वर्षीय व ३ वर्षीय) १२ परीक्षेच्या तारखेत बदल केले असून, या परीक्षा पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. विधी शाखेच्या काही परीक्षेचा निकाल उशिरा लागल्याने तसेच काही निकाल प्रलंबित असल्याने अनेक विद्यार्थी तसेच विद्यार्थी संघटना यांनी अभ्यासासाठी वेळ मिळावा यासाठी विधी शाखेच्या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. यातील काही परीक्षांची सुरुवात २२ मे २०१८ पासून होणार होती, त्या परीक्षा ३० मे २०१८ पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सदर परीक्षेचे सुधारित वेळापत्रक लवकरच विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर केले जाईल.
विधी शाखा : परीक्षेच्या नवीन तारखा
परीक्षा जुनी तारीख नवीन तारीख
1.प्रथम वर्ष एल.एल.बी. - जन. एल.एल.बी. (सेमी.२ ) २२/०५/२०१८ ३०/०५/२०१८
2. तृतीय वर्ष एल.एल.बी. - बी. एल. एस. २२/०५/२०१८ ३०/०५/२०१८
(५ वर्षीय अभ्यासक्रम ) (सेमी.६)
३. एल.एल.बी. (सेमी.६) २२/०५/२०१८ ३०/०५/२०१८
४. पाच वर्षीय एल.एल.बी. (५ वर्षीय अभ्यासक्रम) (सेमी.१० ) २२/०५/२०१८ ३०/०५/२०१८
५.दि्वतीय वर्ष एल.एल.बी. / जन. एल.एल.बी. (सेमी.४ ) २३/०५/२०१८ ३१/०५/२०१८
६. चतुर्थ वर्ष एल.एल.बी. (५ वर्षीय अभ्यासक्रम) (सेमी.८ ) २३/०५/२०१८ ३१/०५/२०१८
७. प्रथम वर्ष एल.एल.बी. - जन. एल.एल.बी. (सेमी.१ ) ०७/०६/२०१८ २५/०६/२०१८
८. तृतीय वर्ष एल.एल.बी. - बी. एल. एस. ०७/०६/२०१८ २५/०६/२०१८
(5 वर्षीय अभ्यासक्रम ) (सेमी.५ )
९. एल.एल.बी. (सेमी.५) ०७/०६/२०१८ २५/०६/२०१८
१०. पाच वर्षीय एल.एल.बी. (५ वर्षीय अभ्यासक्रम) (सेमी.९ ) ०७/०६/२०१८ २५/०६/२०१८
११. दि्वतीय वर्ष एल.एल.बी./ जन. एल.एल.बी. (सेमी.३ ) ०८/०६/२०१८ २६/०६/२०१८
१२. चतुर्थ वर्ष एल.एल.बी. (५ वर्षीय अभ्यासक्रम) (सेमी.७ ) ०८/०६/२०१८ २६/०६/२०१८
विधी शाखेच्या परीक्षेचा निकाल जाहीर
विद्यापीठाने आज विधी शाखेचे दोन निकाल जाहीर केले असून यातील पहिला निकाल एल.एल.बी. प्रथम वर्ष व जनरल एल.एल.बी. सेमिस्टर १ जानेवारी २०१८ मध्ये झालेल्या परिक्षेचा निकाल जाहीर केला असून, या परीक्षेस ६,६३५ विद्यार्थी बसले होते. यातील १९८८ विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. सदरच्या परीक्षेचे उत्तीर्णतचे प्रमाण ३६.२६ टक्के एवढे आहे. तसेच विधी शाखेच्या तृतीय वर्ष ( ३ वर्षीय व ५ वर्षीय) ) एल.एल.बी. सेमिस्टर ५ च्या जानेवारी, २०१८ मध्ये झालेल्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून या परीक्षेस २,४८९ विध्यार्थी बसले होते. सदर परीक्षेचे उत्तीर्णतेचे प्रमाण ३४.६२ टक्के एवढे आहे.