मुंबई विद्यापीठाचे शनिवारी फक्त ११ निकाल जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2017 12:43 AM2017-08-06T00:43:18+5:302017-08-06T00:43:21+5:30

आॅगस्ट महिन्यातले पाच दिवस उलटले तरी मुंबई विद्यापीठाचे तब्बल २१२ निकाल जाहीर झालेले नाहीत. तर, दुसरीकडे विद्यापीठासमोर अजूनही २ लाख ३२ हजार ३१२ उत्तरपत्रिका

University of Mumbai declared only 11 results on Saturday | मुंबई विद्यापीठाचे शनिवारी फक्त ११ निकाल जाहीर

मुंबई विद्यापीठाचे शनिवारी फक्त ११ निकाल जाहीर

Next

मुंबई : आॅगस्ट महिन्यातले पाच दिवस उलटले तरी मुंबई विद्यापीठाचे तब्बल २१२ निकाल जाहीर झालेले नाहीत. तर, दुसरीकडे विद्यापीठासमोर अजूनही २ लाख ३२ हजार ३१२ उत्तरपत्रिका तपासणीचे आव्हान आहे. मुंबई विद्यापीठाची दुसरी डेडलाइन चुकली त्या दिवशी म्हणजे शनिवारी सायंकाळी ७ वाजेपर्यंत विद्यापीठाने फक्त ११ निकाल जाहीर केल्याची माहिती विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आली.
शनिवारी १ हजार २८७ प्राध्यापकांनी उत्तरपत्रिकांची तपासणी केली. शनिवारी सायंकाळी ७ वाजेपर्यंत १३ हजार २०३ उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन पूर्ण करण्यात आले, तर १० हजार ४४२ उत्तरपत्रिकांचे मॉडरेशन पूर्ण झाले आहे. मॉडरेशनसाठी विद्यापीठाकडे ६ लाख ८३ हजार ९९८ उत्तरपत्रिका आतापर्यंत आल्या आहेत. त्यापैकी ७९ हजार ८४५ उत्तरपत्रिकांचे मॉडरेशन करणे शिल्लक आहे.

Web Title: University of Mumbai declared only 11 results on Saturday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.