मुंबई विद्यापीठाचा अर्थसंकल्प ५३९.०४ कोटींचा

By admin | Published: March 17, 2017 05:05 AM2017-03-17T05:05:24+5:302017-03-17T05:05:24+5:30

मुंबई विद्यापीठाने १६० वर्षांच्या गौरवशाली आणि समृद्ध परंपरेचा वारसा पुढे चालवत या वर्षीचा अर्थसंकल्प मांडला. या वर्षीचा मुंबई विद्यापीठाचा अर्थसंकल्प हा ५३९.०४ कोटींचा

The University of Mumbai has an expenditure of Rs 53.94 crore | मुंबई विद्यापीठाचा अर्थसंकल्प ५३९.०४ कोटींचा

मुंबई विद्यापीठाचा अर्थसंकल्प ५३९.०४ कोटींचा

Next

मुंबई : मुंबई विद्यापीठाने १६० वर्षांच्या गौरवशाली आणि समृद्ध परंपरेचा वारसा पुढे चालवत या वर्षीचा अर्थसंकल्प मांडला. या वर्षीचा मुंबई विद्यापीठाचा अर्थसंकल्प हा ५३९.०४ कोटींचा असून ५२.९४ कोटी इतका शिलकीचा आहे. आज पार पाडलेल्या अधिसभेच्या बैठकीत या वार्षिक अर्थसंकल्पाला मंजुरी मिळाली.
यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून महाराष्ट्रातील हौतात्म्य पत्करलेल्या शहिदांच्या मुलांना आणि एकेरी मातृत्व असलेल्या पाल्यांनाही अनुदानित अभ्यासक्रमांचे पदवी आणि पदव्युत्तरचे मोफत शिक्षण मिळणार आहे. तसेच दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ केले जाणार आहे. विशेष म्हणजे ग्रीन कॅम्पसच्या धर्तीवर विद्यापीठाच्या विद्यानगरी परिसरात अनेक वास्तू उभारल्या जाणार आहेत.
यंदाच्या अर्थसंकल्पात मास्टर प्लान आॅफ युनिव्हर्सिटी आॅफ मुंबई विद्यानगरी अँड अदर अपकमिंग कॅम्पसेससाठी १.०० कोटी, झी झ्रझियान-लीन सेंटर फॉर इंडिया- चायना स्टडिजसाठी ५०.०० लक्ष आणि सेंटर फॉर युरोपियन स्टडिजसाठी १५ लाखांची तरतूद आहे. विशेष उपक्रमांत पालघर जिल्ह्यातील प्रस्तावित २०० एकर जागेवर ट्रायबल विद्यापीठाच्या पार्श्वभूमीवर विशेष कौशल्याआधारित अभ्यासक्रमांना सुरुवात होणार असून पालघर जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासात विद्यापीठ महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The University of Mumbai has an expenditure of Rs 53.94 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.