पुन्हा एकदा मुंबई विद्यापीठाचा भोंगळ कारभार झाला उघड, इंटरकॉम सेवा ८ महिने बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2018 04:05 AM2018-12-22T04:05:36+5:302018-12-22T04:05:49+5:30

मुंबई विद्यापीठ आणि तेथे विद्यार्थ्यांसाठी असलेल्या सोईसुविधांचा अभाव हे जणू समीकरणच झाले आहे. मुंबई विद्यापीठाच्या प्रशासनाचा भोंगळ कारभार रोज नव्याने समोर येत असताना त्यात आणखी नवी भर पडली आहे.

University of Mumbai re-opened, Intercom service closed for 8 months | पुन्हा एकदा मुंबई विद्यापीठाचा भोंगळ कारभार झाला उघड, इंटरकॉम सेवा ८ महिने बंद

पुन्हा एकदा मुंबई विद्यापीठाचा भोंगळ कारभार झाला उघड, इंटरकॉम सेवा ८ महिने बंद

Next

मुंबई : मुंबई विद्यापीठ आणि तेथे विद्यार्थ्यांसाठी असलेल्या सोईसुविधांचा अभाव हे जणू समीकरणच झाले आहे. मुंबई विद्यापीठाच्या प्रशासनाचा भोंगळ कारभार रोज नव्याने समोर येत असताना त्यात आणखी नवी भर पडली आहे. मुंबई विद्यापीठाची अंतर्गत इंटरकॉम सेवा गेली ८ महिने बंद असल्याचा प्रकार समोर आला आहे. कलिना संकुलातील इंटरकॉम सेवा बंद असल्याने विद्यार्थ्यांची कामे होण्यास उशीर लागत असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकारामुळे विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी यांचा संवाद होण्यास अडथळे येतात आणि विद्यार्थ्यांची कामे होण्यास उशीर होत आहे. गेल्या ८ महिन्यांपासून बंद असलेल्या इंटरकॉम सेवा पूर्ववत होण्यासाठी आद्याप विद्यापीठ प्रशासन हालचाल करत नसल्याचेच समोर येत आहे.
मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलातील सर्व इमारतींमध्ये असलेली दूरध्वनी सेवा व त्याअंतर्गत असणारे तब्ब्ल ६०० कनेक्शन आहेत. ही सेवा मागील ८ महिने बंद असल्याचे समोर आले आहे. त्यासाठी आवश्यक एमटीएनएलची ईपीबाइक्स मशिन, त्यासाठी लागणारे काडर््स हे सारे संकुलातील रॅकमध्ये भंगारात पडून असल्याचे आढळले आहे. विद्यापीठाच्या संकुलातील काही भाग प्रशासनाने एमटीएनएलला नाममात्र दराने जनरेटर व साधन सामग्री ठेवण्यासाठी दिलेला आहे. या जागेतून वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स परिसरात दूरध्वनी व इंटरनेट सेवा पुरविली जाते. सदर जागेचा भाडेपट्टा करार संपलेला असूनदेखील एमटीएनएलवर विद्यापीठाची मेहरनजर का? असा सवाल युवासेना सिनेट सदस्यांनी विद्यापीठ प्रशासनाला विचारला आहे.
मॅनेजमेंट सदस्य प्रदीप सावंत, शीतल शेठ, सिनेट सदस्यांनी विद्यापीठाच्या इमारती व वेगवेगळ्या विभागात बंद असलेल्या इंटरकॉम सेवेबद्दल त्या विभागात पाहणी केली. लवकरात लवकर दूरध्वनी असलेल्या ६०० इंटरकॉम सेवा चालू करण्याबाबत मुंबई विद्यापीठाला जाब विचारणार असल्याची प्रतिक्रिया प्रदीप सावंत यांनी दिली. विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सेवेवर याचा गंभीर परिणाम होत आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले़
 

Web Title: University of Mumbai re-opened, Intercom service closed for 8 months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.