विद्यार्थ्यांच्या विकासासाठी मुंबई विद्यापीठाची विद्यावाहिनी तलासरीत
By admin | Published: September 12, 2014 11:49 PM2014-09-12T23:49:42+5:302014-09-12T23:49:42+5:30
या विद्यावाहिनीचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर व माजी कुलगुरू डॉ. स्रेहलता देशमुख यांनी केली
तलासरी : मुंबई विद्यापीठाचे विद्यमान कुलगुरू डॉ. राजन वेळुकर व प्र. कुलगुरू डॉ. नरेशचंद्रा यांच्या दूरदृष्टीतून व विद्यापीठ विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. मृदूल निळे यांच्या प्रयत्नातून विद्यापीठाने मोबाइल विद्यावाहिनी सुरू केली.
या विद्यावाहिनीचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर व माजी कुलगुरू डॉ. स्रेहलता देशमुख यांनी केली. ही मोबाइल व्हॅन ग्रामीण व आदिवासी भागातील महाविद्यालयात जाऊन तेथील विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास व्हावा या हेतूने विविध उपक्रम राबविले जाणार आहेत.
मुंबई विद्यापीठाने सुरू केलेली ही विद्यावाहिनी तलासरीत दाखल झाली असून तिचा दहा दिवस मुक्काम तलासरीत राहणार असून या दहा दिवसात ती महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना वेगवेगळी पुस्तके दिली जातील. इंग्लिश स्पिकिंगसाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहीत केले जाईल. या मोबाइल व्हॅनमध्ये इंटरनेटची देखील सुविधा असून विद्यार्थ्यांना ज्ञानाची दालने खुली केली जातील. (वार्ताहर)