Join us

विद्यापीठ ‘नापास’; परीक्षांचे निकाल वेळेवर लावण्यात अपयश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 1:29 AM

पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या वेळापत्रकावरही परिणाम

मुंबई : मुंबई विद्यापीठावर वाढत असलेला परीक्षांचा ताण कमी करण्यासाठी विद्यापीठाने विधि (लॉ) शाखेच्या आठ परीक्षा कॉलेजांमार्फत घेण्याचा निर्णय घेतला. मात्र, विद्यापीठाच्या इतर परीक्षांच्या निकालांचा गोंधळ काही संपत नाही. मुंबई विद्यापीठाला परीक्षांच्या निकालांची डेडलाइन पाळता न आल्याने, मुंबई विद्यापीठ विधि आणि इतर सर्वच परीक्षांचे निकाल वेळेत लावण्यात नापास झाल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे निकालांच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांमधील तणाव कामय आहे.मुंबई विद्यापीठाचे निकाल उशिरा लागल्याने, त्याचा थेट परिणाम पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या वेळापत्रकावर झाला आहे. त्यामुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षाच्या एमए, एमकॉम आणि एमएस्सी अभ्यासक्रमाच्या सर्वच परीक्षा जूनच्या पहिल्या आठवड्यानंतर सुरू होणार आहेत. त्यामुळे त्यांचे निकाल आॅगस्ट-सप्टेंबरमध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमानंतर परदेशी शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहेत. या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया जून-जुलै महिन्यात सुरू होते. मात्र, यंदा परीक्षाच जूनमध्ये होणार असल्याने, त्याचा फटका विद्यार्थ्यांच्या परदेशी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाला बसणार हे निश्चित आहे. पदवीच्याही अनेक परीक्षा जूनपर्यंत पुढे गेल्याने पदवीनंतर परदेशी उच्च शिक्षणासाठी जाण्याच्या तयारीत असलेल्या विद्यार्थ्यांचीही नजर निकालावर आहे.३१ जुलैपूर्वी निकाल लावण्याची मागणीविद्यापीठ पदवी अभ्यासक्रम, व्यावसायिक अभ्यासक्रम अशा अनेक परीक्षांचे निकाल लावावे लागत असल्याने आणि त्यासाठी आवश्यक सक्षम यंत्रणा विद्यापीठाकडे नसल्याने निकाल लागण्यास उशीर होत आहे. पुनर्मूल्यांकन आणि निकालाच्या फोटोकॉपीत गोंधळ वाढत चालला आहे, असा आरोप राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अमोल मातेला यांनी केला आहे.पेपर तपासणीसाठी आधी मेरिट ट्रॅक कंपनीची हाकालपट्टी करावी आणि पारदर्शकता आणावी, अशीही मागणीही त्यांनी केली आहे. विद्यापीठाने निकाल निकाल ३१ जुलै २०१८ पूर्वी जाहीर करावेत. यामुळे परदेशी शिक्षणासाठी जाणाºया विद्यार्थ्यांना दिलासा मिळू शकेल, अशी मागणी विद्यार्थ्यांसह मातेले यांनी केली आहे.

टॅग्स :शैक्षणिकमुंबई विद्यापीठ