नोकरीसाठी विद्यार्थ्यांमागे विद्यापीठाच्या फेऱ्यांचा फेरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2020 02:16 AM2020-08-20T02:16:11+5:302020-08-20T02:16:16+5:30

अशा परिस्थितीत नवीन नोकरीच्या उंबरठ्यावर असलेल्या तरुणांनाही आपल्या नोक?्यांवर गदा येण्याची भीती वाटू लागली आहे.

University rounds behind students for jobs | नोकरीसाठी विद्यार्थ्यांमागे विद्यापीठाच्या फेऱ्यांचा फेरा

नोकरीसाठी विद्यार्थ्यांमागे विद्यापीठाच्या फेऱ्यांचा फेरा

Next

मुंबई :कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाखो तरुणांना आपल्या नोक?्या गमवाव्या लागल्या असल्याची परिस्थिती नुकत्याच एका अहवालातून समोर आली आहे. अशा परिस्थितीत नवीन नोकरीच्या उंबरठ्यावर असलेल्या तरुणांनाही आपल्या नोक?्यांवर गदा येण्याची भीती वाटू लागली आहे.
नोकरीसाठी आवश्यक कागद्पत्रे आणि प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यासाठी येणा?्या विद्यार्थ्यांना पडताळणीसाठी मुंबई विद्यापीठाच्या ४ ते ५ किंबहुना त्याहून अधिक फे?्या माराव्या लागत आहेत. तरीही समान्यपणे महिना लागणा?्या पडताळणी प्रक्रियेला त्याहून अधिक वेळ लागत असल्याने नवीन नोकरीवर असलेले विद्यार्थी , परदेशी जाण्याच्या तयारीत असलेले तरुण चिंताग्रस्त झाले आहेत.
देशातील आणि देशाबाहेरील कंपन्यांमध्ये नोकरी लागल्यावर किंवा त्या कंपनीकडून नोकरीचा प्रस्ताव दिल्यानंतर त्या उमेदवारांना आपल्या शैक्षणिक कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. या कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर त्या कंपनीकडून त्याची पडताळणी करण्यासाठी संबंधित विद्यापीठाची मदत घेतली जाते. यासाठी अनेक कंपन्यांकडून त्रयस्थ एजन्सीची नेमणूक करण्यात येते.
तर अनेक वेळा उमेदवारांकडून त्याची पूर्तता करण्याची सूचना करण्यात येते.लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठासह राज्यातील जवळपास सर्वच विद्यापीठांमधील गुणपत्रिका पडताळणी केंद्रे आणि त्याची प्रक्रिया बंद असल्याने हजारोंच्या नोकºया धोक्यात आल्या आहेत. अनलॉक होत असताना विद्यापीठात मोजकाच कर्मचारी वर्ग उपलब्ध असल्याने विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या वारंवार फेºया माराव्या लागत आहेत.
मुंबई बाहेरील विद्यार्थ्यांसाठी प्रक्रिया प्रवासाची साधने उपलब्ध नसल्याने अधिक किचकट झाली आहे.
मुंबई विद्यापीठात कालीना संकुलातील परीक्षा भवनात ही पडताळणी प्रक्रिया पार पाडली जाते. त्यासाठी महिन्याला आॅनलाइन पद्धतीने चारशे ते पाचशे अर्ज येत असतात. मात्र मार्चपासून मुंबई विद्यापीठाचे कामकाज बंद असल्याने अनेकांची ही पडताळणी प्रक्रियेचे काम अडकून पडले आहे. त्यामुळे नोकरीच्या प्रतीक्षेत असणाºया हजारो उमेदवारांना त्याचा फटका बसू शकतो.

>विद्यार्थ्यांच्या नोकºया वाचवाव्यात
नोकरीसाठी आवश्यक प्रमाणपत्रे पडताळणी पाकक्रिया संपूर्णपणे आॅनलाइन झाल्यास त्यात अधिक पारदर्शकता येईल. यामुळे विद्यार्थ्यांना अधिकच आर्थिक भुर्दंड या प्रक्रियेसाठी सहन करावा लागणार नाहीच शिवाय प्रक्रिया जलद गतीने होऊन त्यांच्या नोकºया वाचू शकतील.
- प्रदीप सावंत, सिनेट सदस्य, युवासेना, मुंबई विद्यापीठ

Web Title: University rounds behind students for jobs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.